राज ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन, भेटीला बोलावण्याचं नेमकं कारण काय?

राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा ठरणार
Raj Thackeray News | Vasant More News
Raj Thackeray News | Vasant More NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. राज ठाकरे हे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्या संदर्भातला आढावाही घेण्यात येणार आहे. राज्यात सध्या हिंदुत्वाच्या आणि भोंग्याच्या मुद्द्यामुळे चर्चेत असलेले महाराष्ट्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुढील सभा पुण्यात होणार आहे. (Raj Thackeray Sabha in Pune Update)

सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. दरम्यान, मनसे नेते वसंत मोरेंना राज ठाकरेंनी फोन करून उद्या सकाळी भेटीसाठी मोरेंना बोलावण्यात आले आहे.

Raj Thackeray News | Vasant More News
IPL 2022 यजुवेंद्र चहलसाठी हा पंजाबी खेळाडू धोक्याची घंटा

पुण्याच होणाऱ्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या सभेतच राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुढील सभेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. 21 ते 28 मे च्या दरम्यान ही सभा पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर होणार आहे. या सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील लिहिले आहे.

1 मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे यांनी भोग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या सभेनंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेनंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात सभा घेणार असल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com