Corona: जिम आणि सलून 50 टक्के क्षमतेने सुरु

सरकारकडून सलून आणि जिमवरील निर्बंधात सूट देण्यात आली आहेत, जाणून घेऊया नवे आदेश काय आहेत.
Corona: Gym and salon started at 50 percent capacity
Corona: Gym and salon started at 50 percent capacity Dainik Gomantak

सरकारकडून सलून आणि जिमवरील निर्बंधात सूट देण्यात आली आहे.आता सलूनला 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर जिम सुद्धा 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.पण यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे लागेल ते पाहूया.

* लसीकरणाचे दोन डोस घेतले असावे

* मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

*सोशल डिस्टंसिंग ठेवणे

Corona: Gym and salon started at 50 percent capacity
बीडमध्ये बस-ट्रकची धडक 4 ठार, 10 जखमी

राज्यात कोरोना विषाणूचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारकडून काल नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे, यामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक नियम आखण्यात आले होते, शनिवारी जारी केलेल्या आदेशात जिम आणि सलून बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते , मात्र आज सुधारित आदेशामध्ये जिम आणि सलून सुरु ठेवण्यास परवानगी देण्यातआली आहे.

कोविड-19 संसर्गामुळे गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 5 जणांचा मृत्यू एकट्या मुंबईत झाला आहे. त्याच वेळी, देशाच्या आर्थिक राजधानीत गेल्या 24 तासांत कोविडच्या 20,318 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे, जी शुक्रवारच्या 20,971 पेक्षा कमी आहे. महाराष्ट्रातील आरोग्य विभागाने यापूर्वी सांगितले होते की, जेव्हा वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी दररोज 800 मेट्रिक टन ओलांडते किंवा 40 टक्क्यांहून अधिक कोविड रूग्ण रुग्णालयात दाखल होतात तेव्हा राज्य लॉकडाऊनचा विचार करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com