Riya Sen Join Bharat Jodo Yatra: भारत जोडोत राहुल गांधी-अभिनेत्री रिया सेन साथ-साथ !

Riya Sen Joins Bhart Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत अभिनेत्री रिया सेनचा सहभागी झाली आहे.
Riya Sen Joins Bhart Jodo Yatra
Riya Sen Joins Bhart Jodo YatraDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने आज राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाली आहे. तसेच तिने कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज विदर्भात या यात्रेचा तिसरा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

'अपना सपना मनी मनी' फेम अभिनेत्री रिया सेन (Riya Sen)राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. ती त्यांच्यासह संवाद साधतांना दिसत आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि जीन्स घातला आहे. तिने काळ्या गॉगलसह हा लुक पुर्ण केला आहे. सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

  • अभिनेत्री पूजा भट्टही सहभागी झाली होती

याआधी बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पूजा भट्टनेही (Pooja Bhatt) काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे.

  • राहुल गांधींंची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद

राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा 71 वा दिवस आहे. ही यात्रेचा महाराष्ट्रात 11 वा दिवस आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या ही यात्रा विदर्भातील अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून या यात्रेला अकोल्यातील पातूर येथून सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. आज अकोल्यामध्ये, दुपारी एक वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. यादरम्यान ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com