एड्सग्रस्तांना कोरोनाचा धोका कमी; एम्सच्या पाहणीतील निष्कर्ष

सर्वसामान्या नागरिकांच्या तुलनेत एड्सग्रस्तांना (AIDS) कोरोना संसर्ग (Covid 19) होण्याचं प्रमाण कमी असल्याचे एका अभ्यास पाहणीमधून समोर आले आहे.
AIIMS Hospital, Delhi
AIIMS Hospital, DelhiDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वसामान्या नागरिकांच्या तुलनेत एड्सग्रस्तांना (AIDS) कोरोना संसर्ग (Covid 19) होण्याचं प्रमाण कमी असल्याचे एका अभ्यास पाहणीमधून समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये दिल्लीतील एम्स रुग्णालयाने (AIIMS Hospital, Delhi) ही पाहणी केली होती. अलिकडेच या पाहणीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून, 164 एचआयव्हीग्रस्तांमध्ये अँटिबॉडिज (Antibodies) अर्थात प्रतिपिंडे 14 टक्के आढळून आली आहेत. या सर्व रुग्णांनी एड्स बाधितांवर केल्या जाणाऱ्या एंटी-रेट्रो व्हायरल (Anti-retroviral) उपचारांसाठी संपर्क करण्यात आला होता. MedRxiv या संकेतस्थळावर हा पाहणी अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

सप्टेंबर आणि नोव्हेंबर 2020 या दरम्यान एचआयव्ही बाधित रुग्णांचे नमुने गोळा करण्यात आले. एम्सच्या पाहणीनुसार, या काळामध्ये दिल्लीत करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 25.7 टक्के एवढा होता. दिल्ली एम्स रुग्णालयाच्या मेडिसीन विभागामधील सहाय्यक प्राध्यापक नीरज निश्चल (Neeraj Nischal) यांनी बोलताना सांगितले, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आम्ही माहिती गोळा केली. दुसऱ्या कोरोना लाटेतील परिस्थीतीविषयी आम्हाला माहिती नाही. मात्र कोरोनाविषयक नियमांचे एकदम काटेकरपणे पालन हे सुध्दा एचआयव्हीग्रस्तांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी असण्याचे कारण असू शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

AIIMS Hospital, Delhi
गुजरातमध्ये जावून सेल्फी काढत असाल तर..जाणून घ्या नियम

एचआयव्हीग्रस्तांमध्ये कमी प्रमाणात प्रतिपिंड आढळून आली. यामागील कारणांवरीही डॉ. नीरज निश्चल यांनी भाष्य केले. एड्सग्रस्त असल्याने कोरोना होऊनही त्यांच्यामध्ये प्रतिपिंडे तयार झाली नसावीत किंवा तयार झालीही असतील, मात्र जास्त काळ राहिली नसतील, असंही तेम म्हणाले.

दिल्लीमधील नागरिकांचे एम्सने सिरो सर्वेक्षणही केले होते. दिल्लीत एप्रिल आणि मे मध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढण्यापूर्वीच सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यामध्ये प्रतिपिंडाटं प्रमाण 74.7 टक्के आढळून आले होते. एवढचं नाही तर कोरोना झालेल्यांपैकी सौम्य लक्षणं आणि कोरोनाची लक्षणं नसणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात लोकांमध्ये अॅटिबॉडीज वाढ झाल्याचे दिसून आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com