'हिंदू सणांवर बंधनं घालू नका तुमचे निर्बंध चुलीत घाला: राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजप आक्रमक झाला असून हिंदू सणांवर निर्बंध घालू नका, असं म्हणत भाजप आमदार राम कदमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
Ram Kadam
Ram KadamDainik Gomantak
Published on
Updated on

BJP MLA Ram Kadam has written a letter to chief minister Uddhav Thackeray शनिवारी 2 एप्रिल रोजी राज्यात साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारे मराठी सनांपैकी एक म्हणजेच गुढीपाडवा (Gudi Padwa)साजरा होतोय. या सणासाठी निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केला गेला आहे. यावर भाजप आक्रमक झाला असून हिंदू सणांवर निर्बंध घालू नका, असं म्हणत भाजप आमदार राम कदमांनी (Ram Kadam) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. (BJP MLA Ram Kadam has written a letter to chief minister Uddhav Thackeray)

Ram Kadam
युवा मंत्री आदित्य ठाकरेंचा विद्यार्थ्यांना सल्ला, म्हणाले- राजकारणापासून दूर राहा

राम कदमांनी पत्रात म्हटलं की, आपल्या सरकारने पुन्हा एकदा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण गुढी पाडवा आणि राम नवमी यावर निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केला आहे. असे जाचक निर्बंध हिंदू सणांवर आपल सरकार का घालत आहे? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आपल्या सरकारला सवाल आहे. कोरोनाच्या संकट काळातून सावरत असताना आता कुठे लोकांची गाडी रुळावर आलीय आणि त्यातुन तुमचे असे निर्णय ज्यामुळे थेट सामान्यावर परिणाम होतो. लोक त्या भीतीच्या वातावरणातून मुक्त होऊन पारंपरिक पद्धतीनं आपले सण साजरे करु इच्छित आहेत. लोकांना मुक्त पणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत, असं कदमांनी पत्रात लिहीलं आहे.

पुढे कदम यांनी असं म्हटलं आहे की, नागरिक आपलं जीवनमान सुरळीत जगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते प्रत्येकाचं प्रत्येकाला व्यवस्थित माहिती आहे. पण सरकारने हे करू नये... असं सांगण्यापेक्षा लोकांना मुक्त पणे त्यांचे सण साजरे करू द्या. आम्हाला आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित पणे माहिती आहे. होळीच्या वेळेस देखील आपल्या सरकारनं शिमगा साजरा करायचा नाही म्हणत निर्बंध घातले होते. आणि वरुन पोलीस केस करू अशा धमक्याही दिल्या होत्या काय झालं सरकारला आमच्या विरोधासमोर सगळे निर्बंध मागे घ्यावे लागलेच ना.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, सरकारमध्ये अशा कोणत्या शक्ती आहेत कि ज्या हिंदू विरोधी काम करत आहेत. त्यांना हिंदूंचे सण बघवत नाहीत का. हिंदू सण आले कि त्यांना दरवेळी निर्बंध आठवतात. हे असे हिंदू विरोधी महाराष्ट्राच्या भूमीत ठेचूनच काढावे लागतील. आपल्या सरकारला गुढी पाडवा आणि राम नवमी याच्यावर निर्बंध घालता येणार नाही. जर चुकून घातले गेलेत तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला म्हणावे लागेल कि तुमचे निर्बंध गेले चुलीत, असं राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

Ram Kadam
महाराष्ट्र सरकारचा अनोखा उपक्रम; आता कैद्यांनाही मिळणार कर्ज

आम्ही आमचा गुढी पाडवा व राम नवमी आणि येणारे सर्व हिंदू सण थाटात जल्लोषात ढोल ताश्या सहितच साजरे करणार. राज्याचे प्रमुख म्हणून आपल्याकडून एवढी अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही हिंदू सणांवर निर्बंध आपण आणि आपल्या सरकारने घालू नये, असं राम कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com