आपल्या खांद्यावर जो भगवा आहे तो, ओरिजनल भगवा आहे. आपला भगवा टेम्पररी नाही। आमचं अख्खं आयुष्य त्यात गेलं आहे. ''सवाल ये नही की बस्ती मे आग कैसे लगी, सवाल ये हे की बंदर के हात माचीस किसने दी''. असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ही टीका केली. (shivsena leader sanjay raut criticize raj thackeray pune)
माचीस देऊन पण उपयोग नाही झाला कारण ती पेटायला काही तयार नाही असे म्हणत राऊतांनी राज ठाकरेंच्या आंदोलनावर नाव न घेता टीका केली आहे. हा महाराष्ट्र आंड्या-पांड्याचा नाही, लेच्या-पेच्यांचा नाही. गेली 15 वर्ष ज्यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरु झाला. हा पोटदुखीतून त्रास सुरु झाला आहे.
संजय राऊत बोलताना म्हणाले की, बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी कोणालाही सोडलं नाही. कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सत्तापरिवर्तन केलं. ही कुंचल्याची ताकद आहे. म्हणून आजही आम्ही व्यंगचित्राच्या कुंचल्यापुढे नतमस्तक होतो. बाळासाहेबांप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार या देशात पुन्हा निर्माण व्हावा. तसेच, देशात सध्या जे काही चाललेलं आहे. एकाधिकारशाही, मनमानी यावर आसूड ओढावे, अशी आम्ही प्रार्थना करतो. ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असं आम्हाला वाटायचं, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलं आहे. अशी टीका त्यांनी काल केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.