Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी! सरकारचा आदेश; जाणून घ्या कारण?
Mumbai-Goa HighwayDainik Gomantak

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी! सरकारचा आदेश; जाणून घ्या कारण?

Mumbai Goa Highway: कोकणात गेल्या दोन महिन्यात पावसामुळे अनेकदा मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
Published on

mumbai goa highway traffic ban on heavy vehicles

कोकणात गेल्या दोन महिन्यात पावसामुळे अनेकदा मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. एकीकडे या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार यावरुन राजकारण सुरु असताना दुसरीकडे, शुक्रवारी (23 ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशाची चांगलीच चर्चा होत आहे.

ऐन गणेशोत्सवादरम्यान सरकारने मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश काढला. ही बंदी 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत तसेच पाच आणि सात दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 आणि 18 सप्टेंबर रोजी असणार आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) बंदी असणाऱ्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 8 सप्टेंबर 11 वाजेपासून ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता आणि 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून ते 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच, सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूकीस परवानगी राहील.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी! सरकारचा आदेश; जाणून घ्या कारण?
Mumbai Goa Highway: महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली, रामदास कदमांनी भाजप मंत्र्यांचा राजीनामाच मागितला

दुसरीकडे मात्र हे निर्बंध जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक (Transportation) करणाऱ्या वाहनांना लागू असणार नाही. याशिवाय मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 च्या रुंदीकरण, रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या वाहनांनाही ही बंदी लागू असणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलिस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी! सरकारचा आदेश; जाणून घ्या कारण?
Mumbai Goa Highway: महाराष्ट्रात मुंबई- गोवा महामार्गावरून राजकारण तापले, संजय राऊतांचा शिंदेवर नेम

मुंबई-गोवा महामार्ग रखडला!

काही दिवसांपूर्वी, राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्ये सुरु झाल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. 2007 नंतर एवढी सरकारे आली पण महामार्गाचे काम होऊ शकले नाही, अशी खंत राज यांनी व्यक्त केली होती. रस्त्यांच्या दुरावस्थेवर ते म्हणाले होते की, केवळ कोकणातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी 8 तास लागतात. या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी! सरकारचा आदेश; जाणून घ्या कारण?
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरुन चाकरमान्यांचा प्रवास होणार सुकर; महत्वाची अपडेट आली समोर

मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडण्याबाबत राज ठाकरे यांनी येथे सुरु असलेले जमिनीचे व्यवहार हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले होते. कोकणी लोकांच्या जमिनी कवडीमोल दराने विकल्या जात आहेत. जेव्हा या महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जातील. त्यामधून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एकदा रस्ता झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव गगनाला भिडतात हे समजून घ्या, असेही राज यांनी यापूर्वी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com