Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraDainik Gomantak

Bharat Jodo Yatra: विदर्भातला आज तिसरा दिवस, राहुल गांधींची पत्रकार परिषद!

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे.
Published on

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील तिसरा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात आणि आनंदात स्वागत केले जात आहे. आज एक वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

  • राहुल गांधींंची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद

राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचा 71 वा दिवस आहे. ही यात्रेचा महाराष्ट्रात 11 वा दिवस आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या ही यात्रा विदर्भातील अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून या यात्रेला अकोल्यातील पातूर येथून सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. आज अकोल्यामध्ये, दुपारी एक वाजता राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. यादरम्यान ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Bharat Jodo Yatra
Osargaon Toll Issue: अन्यथा ओसरगाव टोलनाका सुरू होऊ देणार नाही, राष्ट्रवादी आक्रमक
  • उद्या शेगावला राहुल गांधींची जाहीर सभा

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव (Shegaon) येथे शुक्रवारी सायंकाळी राहुल गांधींनी जंगी सभा होणार आहे. उद्या राहुल गांधी शेगावातील संत गजानन महाराजांच्या समाधीच दर्शन घेऊन येथील सभेला संबोधित करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com