गोव्याला जाणाऱ्या बारामतीच्या दोन कारचा अपघात, एकाचा मृत्यू; अजित पवारांच्या फोनमुळे मध्यरात्री मिळाली मदत

उपमुख्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे हलली यंत्रणा; सात जखमी युवकांना झाली मदत
Baramati 2 car accident at Poladpur | Ajit Pawar Helps
Baramati 2 car accident at Poladpur | Ajit Pawar Helps Dainik Gomantak
Published on
Updated on

Poladpur Accident: बारामती येथील कोष्टी गल्लीमधील आठ युवक दोन वाहनांतून गोव्याला जात होते. ते शनिवारी (8 जुलै) पहाटे एकच्या सुमारास पोलादपूर घाटामध्ये (जि. रायगड) मागून येणाऱ्या भरधाव टँकरने या दोन्ही वाहनांना ठोकरले.

या भीषण अपघातामध्ये सात जणांना किरकोळ दुखापत झाली मात्र वेळीच बाहेर पडता न आल्याने एकाचा मृत्यू झाला.

(Baramati's two car hit by tanker. Help was received at midnight due to deputy CM Ajit Pawar's phone call)

Baramati 2 car accident at Poladpur | Ajit Pawar Helps
Deaths by Drowning in Goa: राज्यात वर्षभरात 36 जणांचा बुडून अंत; जुलै महिन्यात 6 जणांचा मृत्यू

शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातानंतर युवकांना रात्री काय करावे ते सूचत नव्हते. जखमींपैकी एकाने माळेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांना संपर्क साधला. त्यांना अपघाताची आणि तेथील स्थितीची माहिती देत मदत मागितली.

तावरे यांनीही रात्री दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही माहिती कळवली. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्ममंत्री अजित पवार यांनीही झोपेतून उठत तातडीने अपघातग्रस्तांना मदत पोहचवण्यासाठी सुत्रे हलवली.

Baramati 2 car accident at Poladpur | Ajit Pawar Helps
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत वाढ; दक्षिण गोव्यात किंमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

पवार यांनी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आदेशानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीची मदत मिळेपर्यंत माळेगावचे टेके यांचा मृत्यू झाला होता.

किरकोळ जखमी झालेल्या व बचावलेल्या सात युवकांना पुढील वैद्यकिय उपचार देण्याकामी पवार यांनी पुन्हा संबधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच त्यांनी टेके यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन वेळेत करून देण्याबाबत सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com