परदेशी विरुद्ध देशी धावपटूंची शर्यत रंगणार, 'सकाळ' आयोजित बजाज पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची उत्सुकता वाढली

Bajaj Pune International Marathon: सकाळ’ आयोजित बजाज पुणे मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटरची शर्यत प्रथमच होणार असून त्यात विदेशी स्पर्धकांचा सहभाग असल्याने भारतीय स्पर्धकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
sakal Bajaj Pune International Marathon
sakal Bajaj Pune International MarathonDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: ‘सकाळ’ आयोजित बजाज पुणे मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटरची शर्यत प्रथमच होणार असून त्यात विदेशी स्पर्धकांचा सहभाग असल्याने भारतीय स्पर्धकांपुढे आव्हान निर्माण झाले आहे; मात्र विदेशी स्पर्धकांचे आव्हान मोडून काढू, असा विश्वास भारतीय स्पर्धकांनी व्यक्त केला आहे. नवा मार्ग, नवा उत्साह असल्याने व आल्हाददायक वातावरणामुळे मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉनमध्ये वेगवान वेळेची नोंद होईल, अशी अपेक्षा आहे.

महिलांच्या शर्यतीत यंदा फ्रँकफ्रुट (जर्मनी) मॅरेथॉनमध्ये पंधरावे स्थान मिळवत दोन तास २८ मिनिटे ५४ सेकंद अशी वेगवान वेळ नोंदविणारी इथिओपियाची चाला गोडे ही विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. तिच्यापुढे इथिओपियाचीच झेवूदिनेश देगेफा, मेस्केरम तेसफाये आणि केनियाची ग्लाडिया केम्बोई यांचे आव्हान असेल.

देगेफाने यंदा मे महिन्यात बैरूत (लेबनॉन) मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान मिळविताना दोन तास ३३ मिनिटे नऊ सेकंद अशी वेळ दिली आहे. भारतीय स्पर्धकांचा विचार केल्यास परभणीच्या अश्विनी जाधव व ज्योती गवते यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. यंदा दिल्ली येथे राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये अश्विनीने दोन तास ५० मिनिटे अशी वेळ दिली होती.

पुरुषांच्या शर्यतीत केनियाचा जेकब किबेट विजेतेपदाचा प्रमुख दावेदार राहू शकतो. एप्रिल महिन्यात कोरियातील गुनसान आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहावे स्थान मिळविताना त्याने दोन तास १० मिनिटे ५७ सेकंद अशी वेगवान वेळ दिली आहे. त्यामुळे जेकबवर मात करायची झाल्यास भारतीय स्पर्धकांना शिवनाथ सिंग यांचा १९७८ मध्ये केलेला दोन तास १२ मिनिटांचा राष्ट्रीय विक्रमच मोडावा लागेल.

sakal Bajaj Pune International Marathon
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

याशिवाय गेल्यावर्षी चीनमधील यिंगको मॅरेथॉनमध्ये दुसरे स्थान मिळविताना दोन तास १६ मिनिटे दोन सेकंद वेळ देणारा ओल्बाना यादाते, देबेल फेयीसा (दोन तास १८ मिनिटे ५६ सेकंद), अलेमू बलिचा हेसुद्धा विजेतेपदासाठी कसब पणाला लावतील. भारतीय स्पर्धकांत श्रीनु बुगाटा, छत्रपती संभाजीनगरचा प्रल्हाद रामसिंग धनावत, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील मूळचा व सध्या सेनादलात कार्यरत असलेला आंतरराष्ट्रीय धावपटू विक्रम बंगरिया यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.

रवीना, कोमलमध्ये चुरस

महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्येच चुरस राहणार अशी शक्यता आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील वणी (ता. दिंडोरी) येथील रवीना गायकवाड, मूळ सोलापूर जिल्ह्यातील असलेली व काही काळ नाशिकमध्ये सराव केलेली कोमल जगदाळे, कोल्हापूरची आशिया क्रॉस कंट्रीतील ज्युनियर गटातील माजी विजेती सृष्टी रेडेकर, जागतिक क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी झालेली नाशिकची आरती पावरा, सांगलीची राणी मुचंडी यांच्या सहभागामुळे शेवटपर्यंत विजेतेपदासाठी रंगत राहणार आहे.

त्यात उत्तराखंडच्या एकता रावतच्या सहभागामुळे रंगत आणखी वाढणार आहे. रवीनाने यंदा खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत दहा हजार मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते व गेल्याच आठवड्यात पुण्यात झालेल्या स्पर्धेत एक तास १५ मिनिटे ४७ सेकंद अशी वेळ दिली आहे. ज्युनियर गटात पंधराशे व तीन हजार मीटर शर्यतीत राष्ट्रीय पातळीवर पदके जिंकणाऱ्या सृष्टीने यंदापासून आपला मोर्चा अर्ध मॅरेथॉनकडे वळविला आहे. ही तिची दुसरी अर्ध मॅरेथॉन राहणार असून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विश्वास तिने बोलून दाखविला.

sakal Bajaj Pune International Marathon
South Goa Hotel Inspection: हडफडेच्या आगीचा धसका! दक्षिण गोव्यातील 15 हॉटेल्स-पब्जकडे NOC चं नाही, तपासणीत मोठा खुलासा

प्रकाश देशमुख पहिल्याच स्पर्धेत आशावादी

नौदलात कार्यरत असलेला वाशीमचा प्रकाश देशमुख प्रथमच अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असून त्याला सर्वोत्तम कामगिरीचा विश्वास आहे. दहा किलोमीटरमध्ये त्याची सर्वोत्तम वेळ ३० मिनिटे १८ सेकंद अशी असून भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असल्याचे त्याने सांगितले.

याशिवाय कार्तिक करकेरा, नौदलाचा नीतेश कुमार, आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी झालेला सोलापूरचा अरुण राठोड यांच्या सहभागामुळे अर्ध मॅरेथॉनमध्ये स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम वेळ नोंदविली जाण्याची शक्यता आहे.

बजाज पुणे मॅरेथॉनला जागतिक ॲथलेटिक्स लेबल रेस असा दर्जा मिळाला आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पुणे पोलिस महापालिका, सावित्रीबाई फुले विद्यापीठ या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. पोलिस आयुक्त कपसाठी राज्यातून पोलिस १० कि.मी. शर्यतीसाठी सहभागी होत आहेत. शर्यतीच्या मार्गावर धावपटूंना प्रोत्साहन देण्याासाठी सर्वांनी उपस्थित रहावे.

- विकास सिंग (फिटपेज, इंडिया रनिंगचे सीईओ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com