Irrfan Khan
Irrfan KhanDainik Gomantak

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, राणा दाम्पत्याचा मास्टरमाइंडसोबतचा फोटो व्हायरल

अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.
Published on

Maharashtra: अमरावतीमधील केमिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी इरफान खानने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन राणा दाम्पत्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. आता त्याचे फेसबुक प्रोफाईल पाहिल्यानंतर इरफान खानला राणा दाम्पत्य ओळखत होते का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, इरफानने 2019 मध्ये राणा दाम्पत्यासाठी त्याच्या फेसबुकवर अनेक पोस्ट केल्या होत्या, ज्यामध्ये त्याने अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासाठी प्रचार केला होता. एवढंच नाही तर नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांच्यासोबतचा सेल्फीही त्याने फेसबुकवर पोस्ट केला आहे.

Irrfan Khan
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, राणा दाम्पत्याचा मास्टरमाइंडसोबतचा फोटो व्हायरल

दुसरीकडे, इरफानच्या फेसबुक पोस्टमुळे उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला आता नवे वळण लागल्याचे दिसत आहे. इरफानचे राणा दाम्पत्याशी संबंध होते का, राणा दाम्पत्याला तो कसा ओळखत होता, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या इरफान खानच्या फेसबुक (Facebook) पोस्टमध्ये निवडणूक प्रचाराचा एक बॅनरही शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो अमरावतीचे अपक्ष खासदार आणि आमदार राणा दाम्पत्यासाठी मते मागताना दिसत आहे. मात्र, राणा दाम्पत्याने इरफान खानशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.

Irrfan Khan
अमरावती हत्याकांड: कोल्हे यांच्या हत्येचा कट कसा रचला? वाचा संपूर्ण प्रकरण

इरफानचे राणा दाम्पत्यासोबतचे फोटो व्हायरल झाले होते

राणा दाम्पत्याचा प्रचार करताना इरफान खानच्या फेसबुक फीडमध्ये अनेक पोस्ट्स दिसत आहेत. त्याचवेळी आमदार रवी राणा यांनी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे अपक्ष आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. राणा पुढे म्हणाले की, 'निवडणुकीच्या काळात लोक असाच प्रचार करतात.'

तसेच, महाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावती (Amravati) जिल्ह्यात उमेश कोल्हे यांची गेल्या महिन्यात हत्या झाली होती. यामागचे कारण असे सांगण्यात आले आहे की, केमिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कथित पोस्ट केली होती, ज्याचा निकाल या स्वरुपात समोर आला आहे. नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद आणि इस्लाम धर्माबद्दल वक्तव्य केले होते, त्यानंतर यावरुन वाद सुरुच आहे.

इरफानच्या अटकेमुळे अनेक खुलासे झाले आहेत

या हत्येतील मुख्य आरोपी इरफान खानला पोलिसांनी अटक केली आहे. इरफानच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. इरफानवर बलात्काराच्या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणे, संरक्षण देणे असे गंभीर आरोप आहेत. इंदूरच्या आझाद नगर पोलिसांनी अटक केली असून, त्याने हे जघन्य गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com