Air Quality: जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या प्रदूषित शहराला मागे टाकत मुंबई बनले गॅस चेंबर

Mumbai: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई गेल्या दोन आठवड्यांपासून गॅस चेंबर बनली आहे.
Mumbai
MumbaiDainik Gomantak
Published on
Updated on

Air Quality: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई गेल्या दोन आठवड्यांपासून गॅस चेंबर बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवेची गुणवत्ता (AQI) अत्यंत धोकादायक श्रेणीत राहिली आहे.

इतकंच नाही तर स्विस एअर रिसर्चच्या एका परदेशी एजन्सीनुसार, मुंबई आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या सुंदर शहराची हवा आता लोकांची घुसमट करत आहे.

मुंबईतील लोक आता प्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांनी त्रस्त आहेत. शहरातील लोकही झपाट्याने आजारी पडत आहेत.

मुंबईची अवस्था दिल्लीपेक्षा वाईट आहे

मुंबई शहर आता दिल्लीप्रमाणे (Delhi) ‘गॅस अँड डस्ट चेंबर’ बनले आहे. प्रदूषित हवेच्या बाबतीत मुंबईने दिल्लीला मागे टाकले आहेत.

गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील हवेची गुणवत्ता (AQI) अत्यंत खराब (250--350) श्रेणीत राहिली आहे. या प्रदूषित हवेमुळे अनेक दिवसांपासून मुंबईतील लोकांना श्वसनाचे आजार, सर्दी, कफ, खोकला असे आजार होत आहेत.

Mumbai
Mumbai Air Quality Index: वाढत्या प्रदुषणाने मुंबईकर त्रस्त, काळजी घेण्याचं आवाहन

आकडेवारीनुसार, BMC कडे प्रदूषित हवेमुळे मृत्यूची कोणतीही थेट आकडेवारी नाही, परंतु 2017-2021 पर्यंत 13,444 लोकांचा श्वसनाच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूंच्या कारणांमध्ये प्रदूषण आणि रोगराई यांचाही समावेश आहे.

त्यामुळेच, आता शहरातील बडे डॉक्टर लोकांना वाढते प्रदूषण आणि आगामी होळीच्या सणात अधिक काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

हवेची पातळी खालावल्यानंतर श्वसनाच्या रुग्णांची संख्या वाढली

बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ फिजिशियन आणि कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी म्हणाले की, हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्यामुळे अलिकडच्या काळात दमा, ब्रोकायटिस आणि इतर श्वसनाच्या आजारांचे रुग्ण अधिक आढळत आहेत.

शहरातील बदललेले हवामान, वाढती उष्णता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील सततची कामे आणि त्यातून येणारी धूळ आणि धूर यामुळे लोकांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ.भन्साळी सांगतात. डोळ्यात जळजळ होण्याच्या तक्रारीही रुग्ण (Patient) सांगत आहेत.

Mumbai
Mumbai: वडीलांच्या आजारपणाला मुलगा कंटाळला, वडील झोपेत असताना डाव साधला

पर्यटन स्थळांवरही हवेची पातळी खराब आहे

या सगळ्यात मुंबईची विषारी हवा आता कॅमेऱ्यातही कैद होत आहे. दुपार आणि संध्याकाळच्या वेळीही स्वच्छ हवेत धुके आणि धुक्याची चादर दिसून येते.

तर आज संपूर्ण मुंबईचा AQI 269 होता जो अत्यंत खराब श्रेणीत दिसून आला. या ठिकाणी फिरायला किंवा कामासाठी येणाऱ्या लोकांना हवेतील प्रदूषण स्पष्टपणे दिसत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com