Mumbai Air Quality Index: वाढत्या प्रदुषणाने मुंबईकर त्रस्त, काळजी घेण्याचं आवाहन

वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेला आहे.
Air Pollution | Mumbai AQI
Air Pollution | Mumbai AQIDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Air Quality Index: देशभऱात नव्या वर्षात चांगलीचं कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. अगदी आठवड्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर वाढला आहे. निच्चांकी तापमान रोज जणू एक नवा विक्रमचं गाठत आहे. २०२३ वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र प्रदूषणामुळं मुंबईकरांचा श्वास गुदमरला असल्याचही समोर आलंय.  मुंबईत हवेची पातळी घसरली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा बिघडल्याचे चित्र आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईची हवा अत्यंत खराब पातळीपर्यंतही पोहोचली होती. आता पुन्हा त्याच धोक्याच्या पातळीवर मुंबईची हवा आली आहे. त्यामुळं मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेला आहे. तज्ञांनी हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना, वृद्ध प्रौढांना काळजी घेण्यास सांगितलेय.

Air Pollution | Mumbai AQI
Mopa Airport: मोपा विमानतळाला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद, प्रवाशांची आकडेवारी जाणून घ्या..

मुंबईतील हवेची (Air Pollution) गुणवत्ता बिघडली  आहे. वाढत्या प्रदुषणामुळं मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 300 पार तर नवी मुंबईतही हवा गुणवत्ता निर्देशांक 342  अतिशय वाईट पातळीच्या जवळ पोहोचला  आहे. मुंबई शहराचा एक्यूआय 303 वर गेला आहे. तर  मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावचा एक्यूआय 300 वरून अत्यंत खराब' पातळीच्या जवळ पोहोचली  आहे. बीकेसीचा एक्यूआय 307, चेंबुरचा 319 तर अंधेरीत 339 वर  गेला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com