एअर इंडियाच्या महिला वैमानिकाचा मृत्यू! बाथरुममध्ये आढळला मृतदेह

रश्मी गायधनी असं मृत्यू झालेल्या महिला वैमानिकाच नाव आहे. रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक पदावर कार्यरत होत्या.
Air India
Air IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

एअर इंडियाच्या (AIR India) महिला वैमानिकाचा मृतदेह नाशिकमध्ये आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. घरातील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत त्या आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तेव्हा वेळ निघून गेली असल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रश्मी गायधनी असं मृत्यू झालेल्या महिला वैमानिकाच नाव आहे. रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक पदावर कार्यरत होत्या. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बाथरूमध्ये गॅस गिझरमधून वायू गळती झाल्यामुळे रश्मी यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. पोलीसांनी मात्र अद्यापपर्यंत कोणतेही कारण सांगितले नाही. गॅसगळती नसावी असे म्हणत या घटनेचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस घेत आहे. (Air India Latest News Udpates)

एअर इंडियामध्ये रश्मी गायधनी वरिष्ठ वैमानिक होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्येच त्यांचा गुदमरुन रश्मी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. रश्मी गायधनी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Air India
Sudhir Kalingan: कोकणचा 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड

“5 फेब्रुवारीला दर्शन कॉलनीत राहणाऱ्या 48 वर्षीय रश्मी यांचा संध्याकाळी 7च्या सुमारास आंघोळीला गेल्या असता अपघात झाला त्या बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळल्या. उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.” दरम्यान शवविच्छेदन अहवालात संपूर्ण माहिती समोर येईल अशी माहिती सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com