Sudhir Kalingan
Sudhir KalinganDainik Gomantak

Sudhir Kalingan: कोकणचा 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड

दशावतरातील 'नटसम्राट' म्हणून ज्यांची ओळख आहे असे, सुधीर कलिंगण (Sudhir Kalingan) यांचे आज निधन झाले आहे.
Published on

Sudhir Kalingan: कोकण हे अनेक कलागुणांनी परिपूर्ण असे ठिकाण आहे. कोकणातील दशावतार हा पारंपरिक कलाप्रकार जगभर प्रसिद्ध आहे. दशावतरातील 'नटसम्राट' म्हणून ज्यांची ओळख आहे असे, सुधीर कलिंगण (Sudhir Kalingan) यांचे आज निधन झाले आहे. अवघ्या 49व्या वर्षी गोव्यातील खाजगी रुग्णालयात पहाटे 3 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जण्याने संपूर्ण दशावतार कलाकारांमध्ये आणि रसिक प्रेक्षकांमध्ये शोक व्यक्त होत आहे. (The Natsamrat of Konkan Sudhir Kalingan death News)

Sudhir Kalingan
साळगावात निवडणूक रिंगणात भाजप विरुध्द भाजप

मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्त्यांना गोव्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य होते. तसेच दशावतार चालक-मालक संघाचे सचिव होते. कोकणातील पारंपारिक दशावतारी कला जिवंत ठेवण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्यांच्या जाण्यामुळे सर्व दशावतार कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. 'त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासारखा महान कलावंत पुन्हा होणे नाही', अशी प्रतिक्रिया दशावतारी कलावंत अभिनयकुमार नितीन आसयेकर यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com