'तुम्हाला लाज नाही वाटत?', ओवेसींचा बाबरी मशिदीवरून महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ओवेसी म्हणाले, 'सभागृहात उभे असताना उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही बाबरी मशीद पाडली.
AIMIM chief Asaduddin Owaisi slams CM Uddhav Thackeray on Babri Masjid
AIMIM chief Asaduddin Owaisi slams CM Uddhav Thackeray on Babri Masjid Dainik Gomantak
Published on
Updated on

ओबीसी (OBC Reservation)आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा महाराष्ट्रात अजूनही तापलेला असतानाच आता मुस्लिम आरक्षणाचा (Muslim Reservation) मुद्दाही जोर धरू लागला आहे. एआयएमआयएमचे (AIMIMJ) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अधिक जोमाने मांडला जाणार असल्याचे सांगितले आहे. औरंगाबादनंतर सोलापूरमध्ये ओवेसींनी मुस्लिम आरक्षणासाठी 'चलो मुंबई'चा नारा दिला आहे.(AIMIM chief Asaduddin Owaisi slams CM Uddhav Thackeray on Babri Masjid)

मुस्लिम आरक्षणासाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी 11 डिसेंबर रोजी मुंबईत मोठी रॅली काढण्यात येणार आहे. मंगळवारी सोलापूरच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली असून या बैठकीत त्यांनी मुस्लिमांचे मागासलेपण दाखवण्यासाठी काही आकडेमांडले आहेत . मुस्लिम शैक्षणिकदृष्ट्या किती मागासलेले आहेत हे सांगत , 'मुस्लिमांनी तुमच्याकडे शिक्षणात आरक्षणाची मागणी केली आहे. आम्हाला आरक्षण का देत नाही? तुझी जीभ का बंद आहे?'असा सवाल महाविकास आघाडी सरकारसमोर असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधत ओवेसींनी , "लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक म्हणायचे AIMIM ला मत देऊ नका. तुम्ही ओवेसीच्या नावावर मतदान कराल पण त्याचा फायदा शिवसेना आणि भाजपला होईल." त्याचा परिणामही अनेकांवर झाला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हटले. पण सत्तेत येण्याची वेळ आली तेव्हा हे लोक शिवसेनेसोबत गेले.असा हल्लाबोल केला आहे. तसेच ओवेसी म्हणाले, 'शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही. ते भाजपसारखे जातीयवादी आहे. पवार साहेब सांगा शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का? राहुल गांधी मला सांगा शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का? 1992 मध्ये काय झाले ते विसरलात? असा सवाल करत त्यांनी महाविकासघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

AIMIM chief Asaduddin Owaisi slams CM Uddhav Thackeray on Babri Masjid
आपल्याला पेन जिवंत ठेवतो; तलवार नाही

महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ओवेसी म्हणाले, 'सभागृहात उभे असताना उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही बाबरी मशीद पाडली. मग धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही का? त्यांनी शिवसेनेला धर्मनिरपेक्ष ठरवून आमच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप केला. तिघेही मिळून सरकार चालवत आहेत आणि धर्मनिरपेक्षता वाचवायची आहे असा आव आणत आहेत. विधानसभेत उभे राहून तुम्ही मंदिर आणि मशिदीबद्दल बोलता. तुम्हाला लाज नाही वाटत?'असा तिखट सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com