आपल्याला पेन जिवंत ठेवतो; तलवार नाही

स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. तसेच मुसलमान बंधूनी आपल्यावर झालेला अन्याय कधीच विसरू नका.
असदुद्दीन ओवेसी
असदुद्दीन ओवेसीDainik Gomantak

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (AIMIM) आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील विविध शहरांचा दौरा करत आहेत. मंगळवारी ओवेसी आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी सोलापूरला पोहोचले. तसे, त्यांना कायद्याचे पूर्ण ज्ञान आहे. मात्र त्यांनी एक चूक केली. ती अशी की, नंबर प्लेट नसलेल्या कारमधून ते प्रवास करीत होते. या चुकीसाठी त्यांना पोलिसांनी 200 रुपयांचे चलन घेतले.

स्वतःचे कुटुंब वाचवण्यासाठी सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. तसेच मुसलमान बंधूनी आपल्यावर झालेला अन्याय कधीच विसरू नका.शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का? असा सवाल ओवेसी यांनी सोलापूर येथे बोलत असताना उपस्थित केला आहे. हिंदू बंधुपेक्षा मुसलमान बंधू जास्त शिकलेले आहेत. हे पाहणे गरजेचे आहे.

असदुद्दीन ओवेसी
महाराष्ट्र मुख्यमंत्री साह्यता निधीच्या खात्यात 606 कोटी रुपये पडून

नंबर प्लेट नसलेल्या कारमधून

महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होणार आहेत.एमआयएम सर्व जागांवर या निवडणूक लढवणार आहे असे ठरवले आहे. त्या अनुषंगाने ओवेसी राज्यातील विविध भागात दौरा करत आहेत. काही दिवसांपूर्वी ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. आता त्यांनी मंगळवारी सोलापूरला पोहोचले. त्यातच त्यांनी नंबर प्लेट नसलेल्या वाहनातून जात असताना चालान भरावे लागले.

रॅलीला परवानगी नाही

दरम्यान, ओवेसी यांना कोरोनामुळे मुंबईत रॅलीसाठी परवानगीस बंदी आहे. ओवेसी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे एका मेळाव्यात लोकांशी संवाद साधणार होते. मात्र कोरोना मुळे प्रशासनाने त्यांना सभा घेण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे त्यांना २७ नोव्हेंबरचा कार्यक्रम रद्द झाला आहे.

शिवसेनेची जबाबदारी

सभेत बोलत असताना ते म्हणाले, शिवसेना सत्तेसाठी कोनासोबतही युती करू शकते. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायची असेल तर ती जबाबदारी शिवसेनेची आहे.असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com