
Ashok Saraf Viral Video: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते अशोक सराफ यांचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशोक सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृति पुरस्कार 2025 देण्यात आला.
याच पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्यांची आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीदरम्यान अशोक मामांनी अर्थात अशोक सराफांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक अविस्मरणीय भूमिकांबद्दल दिलखुलासपणे गप्पा मारल्या. विशेषतः त्यांनी 'गुपचुप गुपचुप' (1983) या चित्रपटातील गाजलेल्या 'प्रोफेसर धोंड' (Professor Dhond) या व्यक्तिरेखेविषयी सांगितले.
'प्रोफेसर धोंड' हे पात्र मराठी प्रेक्षकांच्या आजही खूप लक्षात आहे. त्यांची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत खूप वेगळी होती. या व्यक्तिरेखेच्या अभिनयातील अनुभव आणि पडद्यामागील गंमतीजंमती सांगताना अशोक सराफांनी त्या भूमिकेतील काही खास संवाद आणि अभिनय पुन्हा करुन दाखवला. एवढचं नाहीतर 'अशें, तुका कळूंक ना?' हा कोकणी शैलीतील डॉयलॉग देखील म्हणून दाखवला.
यावेळी मुलाखतीला उपस्थित असलेल्या निवेदिता सराफ आणि सर्व प्रेक्षकांनी हसून आणि टाळ्या वाजवून त्यांच्या आठवणींना दाद दिली. अशोक सराफ यांनी जेव्हा 'प्रोफेसर धोंड'चा अभिनय पुन्हा सादर केला, तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि विनोदी टायमिंग आजही किती जबरदस्त आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
दरम्यान, हा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) आल्यानंतर चाहत्यांनी तो मोठ्या प्रमाणात शेअर केला. अशोक सराफ यांच्या या दिलखुलास अंदाजाने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून प्रेक्षक त्यांच्या अभिनयाच्या जादूला पुन्हा एकदा सलाम करत आहेत. या वयातही त्यांची ऊर्जा आणि भूमिकांशी असलेले त्यांचे नाते किती घट्ट आहे, हे यातून दिसून येते.
'संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृति पुरस्कार' सारखा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफ यांनी आपल्या आठवणी अशा प्रकारे चाहत्यांसमोर मांडल्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांसाठी एक अमूल्य भेट ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.