मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, तलवार दाखवल्याप्रकरणी कारवाई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात जाहीर सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raj Thackeray
Raj ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत तलवार दाखवल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. (action taken against MNS chief Raj Thackeray for showing sword)


Raj Thackeray
'आता इंधनावरील खर्च होऊ शकतो निम्मा'; गडकरींनी सांगितला नवा फॉर्म्युला

या प्रकरणी अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे या आणखी दोन जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईला (Mumbai) लागून असलेल्या ठाण्यात राज ठाकरे यांनी पलटवार सभा घेतली होती, त्यात त्यांनी तलवार दाखवली होती, त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी (Maharashtra Police) त्यांच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणे आयुक्त जयजित सिंग यांनी सांगितले.

लाऊडस्पीकरवर ठाकरे चर्चेत

राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या लाऊडस्पीकरवर वक्तव्य करून चर्चेत आहेत. मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला अल्टिमेटम देऊन अंतिम मुदत निश्चित केली. सरकारने 3 मे पर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे राज ठाकरे म्हणाले.

त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे योगदान काय आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com