Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! खासगी बसला लागलेल्या आगीत होरपळले 25 प्रवासी

खांबाला धडकून खासगी बस पलटली; काच फोडून बाहेर पडलेले 8 प्रवासी बचावले
Buldhana Samrudhi Expressway Bus Accident :
Buldhana Samrudhi Expressway Bus Accident :Google image
Published on
Updated on

Buldhana Samrudhi Expressway Bus Accident : महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस नागपुरहुन पुण्यााला चालली होती.

बुलढाणात सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ मध्यरात्री 1.30 वाजता हा अपघात झाला. या बसमध्ये अंदाजे 33 प्रवासी होते. त्यापैकी 8 प्रवासी सुखरुप असल्याचे कळत आहे.

दरम्यान, या अपघातात सर्व मृतदेहांची अवस्था ओळखण्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे समजते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रूपयांची भरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

Buldhana Samrudhi Expressway Bus Accident :
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग खचला; एकाच बाजुने वाहतूक सुरू

बस सर्वात आधी लोखंडी पोलला धडकली आणि त्यानंतर काही अंतरावर जाऊन बस पलटी झाली. त्यानंतर बसने अचानक पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त बसमधून आतापर्यंत 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. 8 जण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत.

Buldhana Samrudhi Expressway Bus Accident :
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर दोन बसची धडक; दोन्ही ड्रायव्हरसह 15 प्रवासी जखमी

टायर फुटल्यानं बस खांबावर जाऊन आदळल्याचे ड्रायव्हरने सांगितले आहे. त्यानंतर बस पुढे जाणाऱ्या डिझेल टँकरवर जाऊन आदळली. डिझेल टँकरचा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गाडी सुमारे 30 ते 40 फुट पुढे जाऊन पलटी झाली. त्यानंतर गाडीत आग लागली.

अपघात झाला तेव्हा प्रवासी गाडीत झोपले होते. जे प्रवासी काचा फोडून बसबाहेर पडले, तेवढेच सुखरूप बचावले. बहुतांश प्रवासी नागपूरचे होते तर काही प्रवासी यवतमाळचे होते. अपघात कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com