Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग खचला; एकाच बाजुने वाहतूक सुरू

वाहनधारकांना फटका, जेसीबीच्या सहाय्याने डागडुजी
Mumbai-Goa Highway file photo
Mumbai-Goa Highway file photo Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग हा दोन मोठ्या शहरांना जोडणारा महामार्ग असल्याने तो नेहमीच वर्दळीचा असतो. हा महत्वाचा महामार्ग रत्नागिरीमध्ये खचला आहे. त्यामुळे येथे एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. परिणामी येथील वाहतूक थोडी संथगतीने सुरू आहे.

Mumbai-Goa Highway file photo
Leopard Dead at Dharbandora: धारबांदोड्यातील पेटके येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू

बुधवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अनेक ठिकाणी वाईट झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी या दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा चौपदरीकरण सुरु असलेला रस्ताच खचला आहे. दरम्यान, यावर तातडीने उपाय न केल्यास हा पूर्ण महामार्ग ठप्प होण्याची भीती आहे. रस्ता खचल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करण्यात अडचणी येताहेत. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरु आहे.

दरम्यान, ज्या भागात रस्ता खचला आहे, तेथील निकृष्ट कामाला ग्रामस्थ ठेकेदाराला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, येथे सध्या जेसीबीच्या साह्याने डागडूजी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim elevated road 600 crore project
Nitin Gadkari ashamed Mumbai Goa Highway delay
Porvorim Elevated Road Inauguration
Mumbai Sawantwadi Daily Express Train Timetable
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com