वाशिम : महाराष्ट्रात विदर्भातील वाशीमच्या मानोरा तालुक्यातील शेवटच गाव असलेल्या सोयजना या गावावर शोककळा पसरली आहे. गावातील पवार कुटुंबातील दोन सख्या भावांचा एका तासभराच्या अंतराने मृत्यू झाला. गावात घडलेली ही दुख:द बातमी धनंजय कोल्हे यांना कळली आणि त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचेही उपचारदरम्यान निधन झाले. (A friend died of a heart attack when he know the news of death of two brothers)
सोयजना गावतील जनार्धन पवार किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर येथिल रूग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता, मात्र गावी निघालेल्या जनार्धन पवार (वय 75) यांचा वाटेतच यवतमाळनजिक मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मागे एकूण 2 मुली, 2 मुले, आणि पत्नी आहेत. त्याचवेळी जनार्धन पवार यांचं पार्थिव गावी आल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू मुरली पवार (73 वर्ष) यांना ही बातमी कळली आणि त्यांनाही हृदयविकारचा झटका आला. त्यांना दिग्रस येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचाही वाटेतच मृत्यू झाला.
दोन्ही भाऊ विभक्त असून सुद्धा त्यांच्यातील प्रेम टिकून होतं. हे बंधूप्रेमाच उदाहरण सोयजना गावात बघायला मिळालं. गावातील दोन्ही पवार बंधूंच्या मृत्यूची बातमी कळताच गावतील त्यांचे जिवलग मित्र धनंजय कोल्हे (53 वर्ष) यांनाही हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांचाही उपचारासाठी दिग्रस येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. एकाच दिवशी तीन जनांच्या मृत्यूने सोयजना गावात शोककळा पसरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.