गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात महाराष्ट्रात एफआयआर दाखल !

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांच्यासह कंपनीच्या इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कॉपीराइट कायद्याच्या कलमाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
Google CEO Sundar Pichai
Google CEO Sundar Pichai Dainik Gomantak
Published on
Updated on

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह कंपनीच्या इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कॉपीराइट कायद्याच्या कलमाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुगलने अनधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट 'एक हसीना थी एक दीवाना था' यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिली होती. (A Case Has Been Registered Against Google CEO Sundar Pichai In Maharashtra)

दरम्यान, कॉपीराइट प्रकरणी चित्रपट निर्माते सुनील दर्शन कोर्टात पोहोचले होते. त्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी अंधेरी पूर्वमध्ये एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी कॉपीराइट कायदा 1957 च्या कलम 51, 63 आणि 69 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. सुनील दर्शन हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 2017 मधील त्याचा शेवटचा चित्रपट एक हसीना थी एक दिवाना था होता. दर्शनने आरोप केला आहे की, हा चित्रपट त्याच्या नकळत यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.

Google CEO Sundar Pichai
Republic Day 2022 : राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अनेक अर्थांनी वैशिष्टपूर्ण...

काय म्हणाले सुनील दर्शन

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुनील दर्शनने म्हटले की, “मी आजपर्यंत कुठेही माझा चित्रपट अपलोड केलेला नाही आणि मी तो कोणालाही विकलेला नाही. परंतु मी गुगलला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्याची विनंती करत राहिलो. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कोणीतरी माझी फिल्म यूट्यूबवर चुकीच्या पद्धतीने अपलोड करुन पैसे कमवत आहेत. शेवटी नाराज होऊन मला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला. न्यायालयाने आता एफआयआर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हा तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे.

सुंदर पिचाई यांना पद्मभूषण

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने मंगळवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पद्म पुरस्कारासाठी 128 जणांची नावे होती. त्यापैकी चार जणांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले. त्यापैकी तिघांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे. 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com