Republic Day 2022 : राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अनेक अर्थांनी वैशिष्टपूर्ण...

महाराष्ट्राने साकारला जैवविविधतेवर आधारित चित्ररथ. महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या कास पठाराला स्थान देण्यात आले
Republic day 
Biodiversity in Maharashtra
Republic day Biodiversity in MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशात साजरा होत आहे. या निमित्ताने आज दिल्लीतील राजपथावर देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून पहायला मिळाले. राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री,लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होत आहे. काही दिवसांपुर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या (Maharashtra) चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी राज्यातील नेत्यांनी केंद्र सरकारवर आरोप सुध्दा केला होता. परंतु केंद्राने निर्णय बदलला आणि दिल्लीतील राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी मिळाली.

Republic day 
Biodiversity in Maharashtra
कालीचरण महाराजांविरुद्ध आता फसवणुकीची तक्रार

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली ( Delhi) येथिल राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ हा विशेष होता. यावर्षी महाराष्ट्राने जैवविविधतेवर आधारित चित्ररथ साकारला होता. यावेळी या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राच्या या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जैवविविधतेचं (Biodiversity in Maharashtra) दर्शन भारतीयांना घडून आले. त्यामुळे आजचा महाराष्ट्राचा चित्ररथ अनेक अर्थांनी वैशिष्टपूर्ण ठरला.

“वनराईचा राजा आंबा, ताम्हण आणि मस्त शेकरु

हरियालाचे रुप देखणे, निळे-जांभळे फुलपाखरु

अथांग सागर रम्य किनारे, सह्याद्रीचे उंच कडे

गवत फुलांच्या रंगावरती, महाराष्ट्राचा जीव जडे

जपतो आम्ही जैववारसा, जपतो आम्ही वसुंधरा

झाडे लावू, झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा,” अश्या गायक सुदेश भोसले यांनी संगीतबध्द केलेल्या गाण्याच्या ओळीने याची सुरूवीत झाली.

Republic day 
Biodiversity in Maharashtra
कालीचरण महाराज काळ्या गजाआड

’महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या कास पठाराला स्थान देण्यात आले. तर कास पठारावरच आढळणाऱ्या दुर्मिळ फुल आणि झाडांसोबत ‘सुपरबा’ (Suparba) या सरड्याची प्रतिकृती साकारण्यात आली. चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू (butterfly)‘ब्ल्यू मॉरमॉन’ होते.

महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण (Tamhan) या फुलाचे गुच्छ होते. चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी ‘शेकरू’ची प्रतिमा होती व त्यामागे 14 ते 15 फूट उंचीचा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा (Mango) या वृक्षाची प्रतिमा होती.तसेच दुर्मिळ असलेला माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, मासा तसेच वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड, मासा तसेच ईतर पक्ष्यांच्या 4 ते 5 फूट उंचीच्या प्रतिकृती होत्या.

महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनेक रचनात्मक, कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले होते. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैवविविधतेचा वारसा हा कवितेच्या व मधुर संगीताच्या माध्यमातून मांडण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com