दक्षिण गोव्यातील लोकांपर्यंत पोहोचू न शकणे, हे सरकारचे आणि माझे अपयश, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे

Goa Breaking News Live Update: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या कला, क्रीडा, संस्कृती, गुन्हे, राजकारण यासह विविध क्षेत्रातील ठळक बातम्या.
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

माडाच्या झाडावरून कोसळून कोल्हापूरच्या व्यक्तीचा मृत्यू

माडाच्या झाडावरून कोसळून बाळु धोंडीबा कुंभार (कोल्हापूर) यांचा मृत्यू. नारळ तोडताना घडली घटना. उपचारासाठी म्हापसा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांकडून मृत घोषित.

दक्षिणेतील लोकांपर्यंत पोहोचू न शकणे, हे सरकारचे आणि माझेही अपयश - राणे

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या डॉक्टर व इतर स्टाफ घेण्याबरोबरच इतर सुविधाही देण्यावर आरोग्य खात्याने भर दिला आहे. हे केवळ जिल्हा रुग्णालय राहू शकत नाही, ते गोव्यातील तृतीय श्रेणीतील रुग्णालय म्हणून घोषित करावे लागेल.

या रुग्णालयात सर्व सुविधा असणे आवश्यक आहे, आम्ही दक्षिण गोव्यातील लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. शेवटी ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी आज जाहीर केले.

मिरामार येथील खासगी कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राजेश बोरकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

आरोग्य सेवा लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या व्हिजननुसार आम्ही त्यात अपयशी ठरलो. दक्षिणेतील लोकांपर्यंत पोहोचू न शकणे, हे सरकारचे आणि माझेही अपयश आहे, आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे.

कोरगाव अपहरण प्रकरण, IRB पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या साथीदाराला अटक

कोरगाव येथील दीड वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड नीकेश च्यारी (कोरगाव) या आयआरबी पोलीस कॉन्स्टेबलला पेडणे पोलीसांकडून त्याच्या साथीदाराला अटक. मुलाचे अपहरण करून खंडणी मागण्याचा होता प्लान. अपहरण केलेल्या मुलाचे वडीलही आयआरबी पोलीस.

जमीन, Real Estate माफियांच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाईची TCP मंत्र्यांत हिंमत नाही; पाटकर

TCP मंत्री राणे यांच्यात गोव्यातील जमीन आणि Real Estate माफियांच्या उल्लंघनाविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत नाही. आमदार आंतोन वाझ यांनी सांगूनही भुतानी यांच्या विरोधात कोणीही तक्रार केली नसल्याचा दावा करून त्यांचा मूर्खपणा त्यांच्याच विधानातून उघड झालाय. उल्लंघन करणाऱ्यांवर स्वेच्छा कारवाई करण्यास त्यांना कोण रोखतंय? - अमित पाटकर

डिचोलीत शहरात आता 45 ठिकाणी कॅमेऱ्यांची नजर

डिचोली शहरावर आता कॅमेऱ्यांची नजर. खासदार निधीतून 1 कोटी खर्चून 45 ठिकाणी बसविण्यात आलेले कॅमेरे कार्यान्वित. विनय तेंडुलकर, चंद्रकांत शेट्ये, सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते शुभारंभ.

गांजे आंबेशी पूलावरुन अज्ञाताची म्हादईत उडी, शोध सुरु

गांजे आंबेशी पूलावरुन एका अज्ञात व्यक्तीने म्हादई नदीत घेतली उडी. अग्निशमन दल व फोंडा पोलीस घटनास्थळी. शोध मोहीम सुरु.

पर्वरीत राष्ट्रीय महामार्ग-६६ वर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु

पर्वरीत राष्ट्रीय महामार्ग-६६ वर रस्त्याचे काम, वाहतूक मंदावणार

पर्वरीत राष्ट्रीय महामार्ग-६६ वर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरु, वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता. मार्ग निमुळता झाल्याने वाहन चालकांना काळजीपूर्वक प्रवास करावा तसेच, ओव्हरटेक करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com