Yuzvendra Chahal Towel Dance: भारतीय संघाने तिसऱ्या T20 मध्ये (India vs Sri Lanka 3rd T20I) पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) तुफान फटकेबाजी करत (73 Not Out) सलग तिसरे अर्धशतक झळकावले. अय्यरच्या खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर (Sri Lanka) 19 चेंडूत 6 गडी राखून तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. (Yuzvendra Chahal Towel Dance Is Going Viral)
दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकन संघाचा कर्णधार दासुन शनाकाने 38 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या. मात्र त्यानंतर 5 विकेट्सवर 146 धावाच श्रीलंकन संघाला करता आल्या. 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'मॅन ऑफ द सिरीज' अय्यरने 45 चेंडूंत नऊ चौकार आणि एक षटकार ठोकून 16.5 षटकांत मालिकेतील सलग तिसरे नाबाद अर्धशतक झळकावले. अय्यरने तीन सामन्यांमध्ये एकूण 204 धावा केल्या. तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 22 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात भारताने 4 बाद 148 धावा केल्या. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचा हा सलग 12 वा विजय आहे.
मात्र, तिसर्या टी-20मध्ये भारतीय गोलंदाजांचाच चमत्कार पाहायला मिळाला नाही. तर दुसरीकडे मात्र भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत श्रीलंकेचा संपूर्ण सफाया केला. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीने क्रिकेटप्रेमींना आकर्षित केले. यामध्येच यजुवेंद्र चहल प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्यामुळेही चर्चेचा विषय ठरला.
वास्तविक, भारताची इनिंग सुरु झाली तेव्हा चहल डगआउटमध्ये बसून 'टॉवेल डान्स' करताना दिसला. चहलच्या टॉवेल डान्सने सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु झाली. चाहते चहलच्या डान्सचा जबरदस्त आनंद घेत आहेत. त्याचं झालं असं की, भारताचे सलामीवीर सॅमसन आणि रोहित क्रीझवर असताना भारताची धावसंख्या 6 धावांवर होती, तेव्हाच कॅमेरामनने डगआउटमध्ये बसलेल्या चहलला कॅमेऱ्यात कैद केलं. स्क्रीनवर स्वत:चा फोटो पाहून चहल टॉवेल स्वतःजवळ ठेवून नाचू लागला. चहलची ही स्टाईल लोकांना खूपच आवडली आहे.
शिवाय, तिसर्या T20 मध्ये चहलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. रोहितने चहलला विश्रांती दिल्याचे सांगितले होते. आता भारतीय संघ 4 मार्चला मोहालीमध्ये कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेशी भिडणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.