टीम इंडियाचा 'जलवा' 12 दिवसांत जिंकल्या 2 मालिका

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली आहे तर, संघाने तिसऱ्या आणि अंतिम T20 सामन्यात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला आहे.
Team India won 2 series in 12 days
Team India won 2 series in 12 daysDainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेविरुद्धची (Sri Lanka) टी-20 मालिका 3-0 ने जिंकली आहे तर, संघाने तिसऱ्या आणि अंतिम T20 सामन्यात (India v Sri Lanka) श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला आहे. याआधी, संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. संघाने 16 ते 27 फेब्रुवारी दरम्यान दोन्ही मालिका खेळल्या आहेत, म्हणजेच 12 दिवसात. T20 विश्वचषक 2022 या वर्षी होणार आहे. अशा स्थितीत हा विजय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. हे 5 खेळाडू दोन्ही मालिकेत संघाच्या विजयाचे हिरो ठरले आहेत. (Team India won 2 series in 12 days)

Team India won 2 series in 12 days
पिछाडीवरून मुंबईचा जबरदस्त विजय

श्रेयस अय्यर: श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) श्रीलंकेविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 3 सामन्यात 3 अर्धशतके झळकावली आहेत. संपूर्ण मालिकेत तो आऊटही नव्हता आणि त्याने सर्वाधिक 204 धावा केल्या, यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 170 च्या वरती होता. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एका सामन्यात संधी मिळाली होती आणि त्यात त्याने 25 धावा केल्या.

इशान किशन: इशान किशनच्या (Ishan Kishan) फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते, पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार पुनरागमन केले. या विकेटकीपर फलंदाजाने 2 सामन्यात 53 च्या सरासरीने 105 धावा केल्या आहेत. मात्र, दुखापतीमुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळु शकला नाही. इशानने 89 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली तर त्याचा स्ट्राइक रेट 148 होता. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत इशानला 3 सामन्यात केवळ 71 धावा करता आल्या होत्या.

Team India won 2 series in 12 days
रोहित शर्माने दुसऱ्या T20 मध्ये केले 'हे' तीन मोठे विक्रम

सूर्यकुमार यादव: सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकला नाही, मात्र त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने 54 च्या सरासरीने सर्वाधिक 107 धावा केल्या आहेत. 65 धावांची सर्वात मोठी खेळी खेळत त्याचा स्ट्राईक रेट 195 होता.

व्यंकटेश अय्यर: युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीने चमत्कार केले होते (Venkatesh Iyer). त्याने 3 डावात 92 धावांच्या सरासरीने 92 धावा केल्या तर त्याचा स्ट्राइक रेट 184 होता. याशिवाय वेगवान गोलंदाजाने 2 विकेट्सही घेतले होते. श्रीलंकेविरुद्ध त्याला अवघ्या एका डावात फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने 51 धावा केल्या होत्या.

रवी बिश्नोई: युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली (Ravi Bishnoi), त्याने 3 सामन्यात 25 च्या सरासरीने 3 विकेट्स घेतले. तसेच त्याची इकोनॉमी 6.33 एवढी राहिली. त्याचवेळी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या केवळ एका सामन्यातच संधी देण्यात आली होती, आणि त्यात त्याने एक विकेट आपल्या नावावर केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com