हरभजन सिंग म्हणाला, 'मी टीम इंडियाचा कर्णधार बनू शकलो नाही कारण...

हरभजनने म्हटले आहे की, 'मी कधीही टीम इंडियाचा (Team India) कर्णधार बनू शकलो नाही, कारण मी बीसीसीआयमध्ये कुणालाच ओळखत नव्हतो.'
Harbhajan Singh
Harbhajan SinghDainik Gomantak
Published on
Updated on

हरभजन सिंगने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. तो बराच काळ भारतीय संघाबाहेर (Indian Cricket Team) होता. निवृत्ती घेतल्यानंतर, हरभजन सातत्याने आपल्या वक्तव्यामुळे चर्चेच राहतो. मग तो संघाबाहेर जाणं असो किंवा माजी खेळाडूंसोबत दुसरा विश्वचषक खेळणे असो, हरभजनने (Harbhajan Singh) प्रत्येक मुद्द्यावर आपला स्पष्टक्तेपणा दाखवला आहे. पुन्हा एकदा हरभजन खुलेपणानं बोलला असून यावेळी मुद्दा कर्णधार पदाचा आहे. हरभजनने म्हटले आहे की, 'मी कधीही टीम इंडियाचा (Team India) कर्णधार बनू शकलो नाही, कारण मी बीसीसीआयमध्ये (BCCI) कुणालाच ओळखत नव्हतो.' (Harbhajan Singh Says I Could Not Captain Team India Because I Dont Know Anyone In BCCI)

दरम्यान, हरभजनने आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली त्याने मुंबईसाठी चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले आहे.

Harbhajan Singh
PSLवर भारत-वेस्ट इंडिजचा प्रभाव; 'या' संघाचा विजय रोखणार

मी या कामगिरीचा उल्लेख करत नाही

हरभजन क्रिकेट कॉमशी बोलताना याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. त्याला कधीच टीम इंडियाचे कर्णधारपद का मिळाले नाही याचा विचार कधी केला का? जेव्हा तु मुंबईला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून दिले तेव्हा मुंबई इंडियन्ससह तुझ्या कर्णधारपदाचा कोणीही उल्लेख केला नाही. यावर हरभजन म्हणाला, "हो, ही माझी उपलब्धी आहे ज्याबद्दल कोणीही बोलत नाही. मी बीसीसीआयमध्ये कोणालाच ओळखत नव्हतो, जो माझ्या नावाची कर्णधारपदासाठी शिफारस करेल.''

तो पुढे म्हणाले, "पण हा मुद्दा बाजूला ठेवा. मला माहित आहे की, मी कर्णधारपदाचे नेतृत्व करण्यास सक्षम होतो कारण आम्ही अनेक कर्णधारांना मार्गदर्शन करायचो. मी भारतीय संघाचा कर्णधार होतो की नाही याने काही फरक पडत नाही. माझ्या देशाच्या संघाचा कर्णधार होऊ शकलो नाही याचे मला कोणतेही दु:ख नव्हते. मी एक खेळाडू म्हणून देशाची सेवा करण्यास तयार होतो."

Harbhajan Singh
भारत दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

धोनीबद्दल कोणतीही तक्रार नाही

2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील अनेक खेळाडू 2015 च्या विश्वचषकातही खेळू शकले असते, असे हरभजनने निवृत्तीनंतर अनेकदा म्हटले आहे. हरभजनला तत्कालीन कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) नाराज असल्याचे विचारले असता तो म्हणाला, “नाही, अजिबात नाही. माझी धोनीविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. इतक्या वर्षांपासून तो माझा चांगला मित्र आहे. माझी तक्रार बीसीसीआय, त्यावेळच्या सरकारकडे आहे. मी बीसीसीआयला सरकार म्हणतो.''

तो पुढे म्हणाला, “त्या काळातील निवडकर्त्यांनी माझ्या कामगिरीला न्याय दिला नाही. संघ एक होऊ नये असे त्यांना सातत्याने वाटत होते. महान खेळाडू चांगली कामगिरी करत असताना नवीन खेळाडू आणण्याची काय गरज आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com