Yuvraj Singh 6 Sixes Anniversary: T20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाने अनेक दिग्गज क्रिकेटपटू तयार केले आहेत, ज्यांनी अफलातून कामगिरी केली आहे. तथापि, कोणाच्याही मनात येणारे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे नाव दुसरे तिसरे कोणी नसून भारतीय फलंदाज युवराज सिंग आहे.
युवीने या फॉरमॅटवर वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवले. जेव्हा लोक युवीबद्दल विचार करतात तेव्हा त्यांना त्याचे 6 षटकार आठवतात. आज या पराक्रमाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, 2007 च्या ICC T20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने 19 सप्टेंबर 2007 मध्ये सहा षटकार मारले होते. इंग्लंडचा (England) स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला युवीने हे षटकार मारले होते.
हे पहिल्यांदाच T20 इंटरनॅशनलमध्ये घडले आणि त्यानंतर युवराजला 'सिक्सर किंग' म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
16 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताचा (India) सुपर 8 च्या बाद फेरीत इंग्लंडशी सामना होत होता. प्रथम फलंदाजी करताना युवीचा आंद्रे फ्लिंटॉफसोबत वाद झाला, तेव्हा भारत सावधपणे खेळत होता. तेव्हाच युवीने ब्रॉडचा समाचार घेण्याचा निर्णय घेतला, जो नवीन षटक टाकणार होता.
ब्रॉडच्या नवीन षटकात युवीने पहिला षटकार काउ-कॉर्नरवर मारला, त्यानंतर दुसरा षटकार बॅकवर्ड स्क्वेअर-लेगच्या दिशेने मारला, तिसरा षटकार लाँग-ऑफला लगावला, त्यानंतर चौथ्या फुल-टॉस चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटवर षटकार मारला. युवीने पुन्हा मिडविकेटवर पाचवा आणि सहावा षटकार मारला, त्याने अवघ्या 12 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले होते.
दुसरीकडे, त्याच्या विक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एका दशकानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती अन्य कोणत्याही फलंदाजाला करता आली नाही. टीम इंडियामध्ये आणि बाहेर असूनही 'सिक्सर किंग' म्हणून युवराजची ओळख कायम आहे.
आपल्या 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये युवराजने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग 6 षटकार मारणारा युवराज हा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज आहे.
एका वेगवान गोलंदाजाला सलग 6 षटकार मारणारा युवराज पहिला फलंदाज ठरला. आतापर्यंत, युवराजशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इतर कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
वन डेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हर्षल गिब्सने एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. गिब्सने 2007 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ही कामगिरी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.