Yuvraj Singh: युवराज-हेजलला कन्यारत्न; सोशल मिडियावर फोटो शेअर करत दिली गोड बातमी

Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second Baby: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग दुसऱ्यांदा बाप झाला आहे.
Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second Baby
Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second BabyDainik Gomantak
Published on
Updated on

Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second Baby: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग दुसऱ्यांदा बाप झाला आहे. त्याची पत्नी हेजल कीच हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

युवराजने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. युवराजने ट्विट करुन सांगितले की, त्याच्या घरी एका मुलीने जन्म घेतला आहे आणि तो बाप झाला आहे.

युवराज सिंग दुसऱ्यांदा बाप झाला

युवराज सिंगने पत्नी हेजल कीचसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटोत दोघेही आपल्या मुलांसोबत दिसत आहेत. पोस्ट शेअर करताना युवराजने लिहिले की, 'छोटी राजकुमारी आभाने आमचे कुटुंब पूर्ण केले आहे.' जानेवारी 2022 मध्ये हेजल किचने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.

Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second Baby
ODI World Cup: भारताला मिळाला दुसरा युवराज सिंग, वर्ल्डकपमध्ये 'या' खेळाडूला संधी मिळाली तर...!

युवराज-हेजलचे 2016 मध्ये लग्न झाले होते

दरम्यान, 2016 मध्ये युवराज सिंग (Yuvraj Singh) हेजल कीचबरोबर लग्न बेडित अडकला. याआधी युवराज सिंग आणि हेजलची लव्हस्टोरीही चर्चेत होती. हेजलसोबत लग्न करण्यासाठी युवराजला खूप संघर्ष करावा लागला.

एका मुलाखतीत युवराजने सांगितले होते की, हेजलने जवळपास 3 महिन्यांनंतर सोशल मीडियावर त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली होती.

हेजल कीच अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटात तिने करीना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second Baby
Indian Cricket: युवराज-शास्त्रीच नाही तर 'या' स्टार खेळाडूने एका षटकात मारले होते 6 षटकार, नाव ऐकून...!

2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

युवराज सिंगने 10 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवराज सिंग हा भारताच्या दोन वर्ल्ड चॅम्पियन (2007 मध्ये वर्ल्ड टी20 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप) संघांचा एक भाग होता आणि त्याने दोन्ही स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीने विशेष छाप पाडली होती.

युवराजने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळले. युवीच्या 40 कसोटी सामन्यांच्या 62 डावात एकूण 1900 धावा आहेत, एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, युवराजने 278 डावात एकूण 8701 धावा केल्या. त्याचबरोबर 58 T20 मध्ये 1177 धावा केल्या. त्याने कसोटीत एकूण 9, एकदिवसीय सामन्यात 111 आणि T20 मध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com