गोव्याच्या एथनला दहाव्या क्रमांकाचे बक्षीस

राष्ट्रीय 14 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत आठ गुणांची कमाई
गोव्याच्या एथनला दहाव्या क्रमांकाचे बक्षीस
Published on: 
Updated on: 

पणजी : गोव्याचा दहा वर्षीय बुद्धिबळपटू एथन वाझ याने अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय 14 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या गटात दहाव्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले. त्याने स्पर्धेत एकूण आठ गुणांची कमाई केली.

गोव्याच्या एथनला दहाव्या क्रमांकाचे बक्षीस
...म्हणून मॅथ्यू वेडने केली तोडफोड

एथनचे सध्या 1792 एलो गुण असून स्पर्धेत त्याला 21 वे मानांकन होते. स्पर्धेतील अकरा फेऱ्यांनंतर त्याला संयुक्त सातवा क्रमांक मिळाला, मात्र टायब्रेकर गुणांत तो दहाव्या स्थानी घसरला. त्याने स्पर्धेत सात विजय व दोन बरोबरीची नोंद केली. दोन डावांत तो पराभूत झाला.

गोव्याच्या एथनला दहाव्या क्रमांकाचे बक्षीस
अनिरुद्ध थापाचा चेन्नईयीनशी करार कायम

गुजरात राज्य बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 325 बुद्धिबळपटू होते, त्यापैकी 217 खेळाडू खुल्या गटात सहभागी झाले. गोव्याच्या अन्य खेळाडूंत साईराज वेर्णेकर याने सात, जॉय काकोडकर याने साडेसहा, व्हिवान बाळ्ळीकर याने सहा, एड्रिक वाझ याने पाच, लव्ह काकोडकर याने पाच गुणांची नोंद केल. मुलींत आर्या दाभोळकर हिने पाच गुण नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com