"तो लहान मुलगा नाही, तो एक वादळ आहे!" WWEच्या रिंगणात वैभव सूर्यवंशीची दहशत! दिग्गज फायटरने टेकले गुडघे Watch Video

Drew McIntyre Vaibhav Suryavanshi: जागतिक कीर्तीचा प्रसिद्ध डब्लूडब्ल्यूई स्टार ड्रू मॅकइन्टायर याने वैभवच्या खेळावर प्रभावित होऊन त्याला एक अतिशय खास मेसेज दिला.
Drew McIntyre Vaibhav Suryavanshi
Drew McIntyre Vaibhav SuryavanshiDainik Gomantak
Published on
Updated on

Drew McIntyre Vaibhav Suryavanshi: आयपीएल 2026च्या हंगामात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकणारा राजस्थान रॉयल्सचा अवघ्या 15 वर्षांचा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या जागतिक स्तरावर चर्चेत आला. वैभवने इतक्या लहान वयात दाखवलेल्या अफाट कौशल्याचे कौतुक आता थेट परदेशातूनही होऊ लागले. जागतिक कीर्तीचा प्रसिद्ध डब्लूडब्ल्यूई स्टार ड्रू मॅकइन्टायर याने वैभवच्या खेळावर प्रभावित होऊन त्याला एक अतिशय खास मेसेज दिला, ज्याची सध्या क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच ड्रू मॅकइन्टायर हा जिममध्ये वर्कआऊट करताना वैभव सूर्यवंशीचे नाव असलेला टी-शर्ट परिधान करुन दिसला होता, ज्याद्वारे त्याने या तरुण भारतीय क्रिकेटपटूला आपला पाठिंबा दर्शवला होता. आता पुन्हा एकदा त्याने वैभवचे जाहीर कौतुक केले. आयपीएल 2026च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध 7 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे राजस्थानचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले.

Drew McIntyre Vaibhav Suryavanshi
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या विकेटनंतर हायव्होल्टेज ड्रामा, कॅप्टन रियान पराग चांगलाच भडकला; भर मैदानात झापलं VIDEO

राजस्थानचा संघ हा सामना हरला असला, तरी वैभवने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करत 47 चेंडूत 96 धावांची वादळी खेळी खेळली. सलग दुसऱ्या सामन्यात त्याचे शतक अवघ्या काही धावांनी चुकले असले, तरी त्याच्या या खेळीने सर्वांना थक्क केले.

Drew McIntyre Vaibhav Suryavanshi
IPL 2026: मॅचनंतरही हायव्होल्टेज ड्रामा! विराट कोहली भडकला; भरमैदानात ट्रॅव्हिस हेडला…, VIDEO होतोय व्हायरल

वैभवच्या या शानदार कामगिरीनंतर डब्ल्यूडब्ल्यूईचा टॉप स्टार असलेल्या ड्रू मॅकइन्टायरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वैभवसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली. मॅकइन्टायरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "वैभव सूर्यवंशी अवघ्या 15 वर्षांचा असताना जे काही करत आहे, त्याचा विचारही कदाचित कोणी करु शकत नाही. हल्ला बोल, यंग मॅन!" मॅकइन्टायरच्या या विधानावरुन वैभवने आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मोठी छाप पाडली, हे स्पष्ट होते.

Drew McIntyre Vaibhav Suryavanshi
GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

ड्रू मॅकइन्टायर हा सध्या डब्ल्यूडब्ल्यूई मधील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय स्टार्सपैकी एक मानला जातो. 2020 च्या रेसलमेनियामध्ये ब्रॉक लेसनरचा पराभव करुन त्याने पहिल्यांदा डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिप जिंकली होती आणि तेव्हापासून त्याचा दबदबा कायम आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही त्याने कोडी रोड्सला पराभूत करुन अनडिस्प्यूटेड डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. अशा या जागतिक दर्जाच्या फायटरने भारताच्या अवघ्या 15 वर्षांच्या क्रिकेटपटूचे तोंडभरुन कौतुक केल्यामुळे भारतीय क्रीडा रसिकांकडून आणि वैभवच्या चाहत्यांकडून मॅकइन्टायरचे आभार मानले जात आहे, तसेच सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com