

Riyan Parag Scolds Vaibhav Suryavanshi: इंडियन प्रीमियर लीग 2026च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात वैभवने 96 धावांची वादळी खेळी खेळली. त्याच्या याच शानदार खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या डावात 214 धावांचा डोंगर उभारु शकला.
या संपूर्ण सामन्यात राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरुनही वैभवला डगआऊटमध्ये आपला कर्णधार रियान परागकडून ओरडा खावा लागला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे क्रिकेटप्रेमी आणि वैभवचे चाहते कमालीचे संतप्त झाले आहेत.
वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 97 धावांची तुफानी खेळी खेळली होती. आपला हाच फॉर्म त्याने क्वालिफायर 2 मध्येही कायम ठेवला. गुजरातविरुद्ध त्याने 47 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 96 धावा कुटल्या. दुर्दैवाने, तो सलग दुसऱ्या सामन्यात आपले शतक पूर्ण करण्यापासून अवघ्या काही धावांनी चुकला.
राजस्थानसाठी इतकी मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी करुनही डगआऊटमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये कर्णधार रियान पराग हा 15 वर्षीय वैभवशी अत्यंत रागात बोलताना आणि त्याला काहीतरी समजवताना दिसत आहे. परागचा चेहऱ्यावरील राग स्पष्टपणे जाणवत असून वैभव सलग दुसऱ्यांदा शतकापासून मुकल्यामुळेच पराग त्याच्यावर चिडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मात्र, एका 15 वर्षांच्या युवा खेळाडूने संघाला संकटातून बाहेर काढून एवढी मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही त्याला जाहीरपणे ओरडणे चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. वैभव सूर्यवंशी हा आपल्या अप्रतिम खेळाने अल्पावधीतच चाहत्यांचा आवडता खेळाडू बनला, त्यामुळे त्याच्यासोबत झालेल्या या गैरवर्तनानंतर सोशल मीडियावर कर्णधार रियान परागवर सडकून टीका केली जात आहे. अनेक चाहत्यांनी रियानच्या या वृत्तीवर तीव्र संताप व्यक्त केला.
एका चाहत्याने सोशल मीडियावर (Social Media) आपली नाराजी व्यक्त करताना लिहिले की, "टीव्हीवर हा प्रकार पाहताना मला अत्यंत वाईट वाटले. रियान पराग हा कर्णधार बनण्याच्या लायकीचा नाही. तो सामन्यादरम्यान मैदानावरही इतर खेळाडूंवर विनाकारण राग काढत होता." सध्या सोशल मीडियावर परागच्या नेतृत्वावर आणि त्याच्या वागणुकीवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.