WFI Suspended: भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द! जागतिक संघटनेची कडक कारवाई

WFI Suspended: जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रदद केले आहे. त्यामुळे आता भारतीय कुस्तीपटूंना भारताच्या झेंड्याखाली खेळता येणार नाही.
WFI Membership Suspended
WFI Membership SuspendedDainik Gomantak
Published on
Updated on

WFI membership suspended by United World Wrestling : भारतीय कुस्ती महासंघ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे.

भारतीय कुस्ती महासंघ वेळेत निवडणूका घेऊ न शकल्याने ही कारवाई जागतिक कुस्ती संघटनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू भारताच्या झेंड्याखाली खेळू शकणार नाहीत.

यामुळे आता १६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेसाठीच्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तटस्थ झेंड्याखाली सहभागी होऊ शकतात.

WFI Membership Suspended
Wrestlers Protest: ब्रिजभूषण यांचे पाय खोलात! पोलिसांच्या हाती लागले फोटोंसह 'हे' महत्त्वाचे पुरावे

जागतिक कुस्ती संघटनेने निवडणुका घेण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली होती. पण भुपेंद्र सिंग बाजवा यांच्या नेतृत्वातील ऍड-हॉक पॅनेलला निर्धारित कालावधीत निवडणुका पूर्ण करण्यात अपयश आले आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने 27 एप्रिल रोजी ऍड-हॉक पॅनेलची नियुक्ती केली होती आणि समितीने 45 दिवसांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक होते. २८ एप्रिलला जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाविरुद्ध निर्देश जारी केले होते. तसेच ४५ दिवसात निवडणुका झाल्या नाहीत, तर निलंबित केले जाईल, अशी वॉर्निंगही दिली होती.

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक यापूर्वी ७ मे रोजी होणार होती, पण क्रीडा मंत्रालयाने ही प्रक्रिया रद्दबातल ठरवली होती. तसेच निवडणूक अनेकदा विविध कारणांनी रद्द झाली.

WFI Membership Suspended
भारताला धक्का! विनेश फोगट 'या' कारणाने Asian Games मधून बाहेर; 19 वर्षीय खेळाडूला संधी

नक्की प्रकरण काय?

या वर्षाच्या जवळपास सुरुवातीपासून भारताच्या काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन केले होते.

आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी महिला खेळाडूंचा लैंगिक छळाचा आरोप ब्रीजभूषण यांच्यावर केला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. याचप्रकरणामुळे ब्रिजभूषण यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते.

तसेच त्यांच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. तसेच याच प्रकरणाची दखल जागतिक कुस्ती संघटनेने घेतली होती. तसेच त्यांनी भारतीय कुस्ती महासंघालाही याबाबत फटकारले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com