Wrestlers Protest: कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात तक्रारदाराच्या दाव्याला पुष्टी देणारी छायाचित्रे जोडलेली आहेत.
आरोपपत्रात अनेक छायाचित्रेही सादर करण्यात आली आहेत ज्यावरून हे सिद्ध होते की, लैंगिक छळाची घटना घडलेल्या वेळी ब्रिजभूषण शरण सिंह उपस्थित होते. अशोका रोड, दिल्ली येथे असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यालयात व्हिजिटर रजिस्टर किंवा सीसीटीव्ही नव्हते. त्यामुळे ही छायाचित्रे महत्त्वाची ठरणार आहेत.
यावेळी ब्रिजभूषण यांच्या निवासस्थानाचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आयपीसीच्या कलम ५०६, ३५४ आणि ३५४ ए अंतर्गत लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग केल्याप्रकरणी खटला चालवला जाऊ शकतो.
यासाठी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. दिल्ली पोलिसांनी राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रानुसार, भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या चार छायाचित्रांनुसार, बृजभूषण शरण सिंह महिला कुस्तीपटूसोबत कझाकिस्तानमध्ये उपस्थित होते.
त्याचवेळी, असे दोन फोटो आहेत ज्यामध्ये ब्रिजभूषण कुस्तीपटूच्या जवळ असल्याचे दिसून येते. फोटो, कॉल डिटेल्स आणि WFI कडून मिळालेल्या साक्षीदारांच्या रेकॉर्डच्या आधारे, आरोपपत्रात असे म्हटले आहे की ब्रिजभूषण सहापैकी पाच पीडितांनी सांगितलेल्या छळाच्या ठिकाणी उपस्थित होते.
पहिल्या कुस्तीपटूने केलेल्या आरोपांमध्ये असे म्हटले आहे की, प्रशिक्षक तिला ब्रिजभूषणला भेटायला घेऊन गेले. एका हातात झेंडा होता म्हणून मी दुसऱ्या हाताने त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण ते हलले नाही.
एकदा कुस्ती लीगमध्ये सेट हरल्यावर मी टीम बॉक्समध्ये गेली होती. ब्रिजभूषण तिथे आले आणि त्यांनी मला जबरदस्तीने मिठी मारली. त्यांनी मला 15 ते 20 सेकंद धरले. मी त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला पण ते हलले नाही.
दोन छायाचित्रांमध्ये ब्रिजभूषण कुस्तीपटूजवळ उभे असल्याचे दिसत आहे. ब्रिजभूषण त्या ठिकाणी उपस्थित होते याचा पुरावा व्हिडिओ आणि फोटो आहेत.
दुसऱ्या कुस्तीपटूने आरोप केला की, प्रशिक्षकासह मला WFI कार्यालयात बोलावण्यात आले. त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले मात्र यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे सांगितले. त्या दिवशी प्रशिक्षक आणि पीडित तरुणी दिल्लीच्या त्या भागात उपस्थित असल्याचा पुरावा या प्रकरणात आहे.
संघाच्या छायाचित्रादरम्यान ब्रिजभूषण यांनी चुकीच्या पद्धतीने हात पकडल्याचा आरोप एका खेळाडूने केला आहे. इतर खेळाडूंनीही असेच आरोप केले आहेत. आरोपपत्रात त्या पुराव्यांचा उल्लेख आहे ज्यावरून ब्रिजभूषण त्यावेळी तिथे उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.