Manika Batra
Manika Batra Dainik Gomantak

World TT Championships: वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मनिका चमकली; हंगेरीविरुद्धच्या भारताच्या विजयात निभावली महत्वाची भूमिका

World Table Tennis Championships: बुसान येथे रविवारी झालेल्या जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधील दोन्ही एकेरीचे सामने मनिका बत्राने जिंकले.
Published on

World Table Tennis Championships: बुसान येथे रविवारी झालेल्या जागतिक टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधील दोन्ही एकेरीचे सामने मनिका बत्राने जिंकले. भारतीय महिला संघाने हंगेरीचा 3-2 असा पराभव केला. भारतीय महिला संघाच्या या विजयात मनिकाने महत्त्वाची भूमिका निभावली. मात्र, भारतीय पुरुष संघाला दुसऱ्या गटातील सामन्यात पोलंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. शुक्रवारी चीनविरुद्धच्या दोन्ही एकेरीत पराभव पत्करलेल्या मनिकाचे चांगले पुनरागमन होते, जेव्हा भारत 2-3 ने पिछाडीवर पडण्यापूर्वी मोठ्या अपसेटच्या वाटेवर होता.

याआधी शुक्रवारी मनिकाने चीनविरुद्धही दुहेरी यश मिळवले होते पण भारतीय संघाला तो सामना 2-3 असा गमवावा लागला होता. भारताची अव्वल महिला खेळाडू मनिकाला सुरुवातीच्या एकेरीच्या लढतीत डोरा मदरासविरुद्ध संघर्ष करावा लागला पण जागतिक क्रमवारीत 36व्या क्रमांकावर असलेल्या मनिकाने 8-11, 11-5, 12-10, 8-11, 11-4 असा विजय मिळवला. यानंतर हंगेरीच्या जॉर्जिना पोटाने दुसऱ्या एकेरीत श्रीजा अकुलाचा 11-3, 11-7, 9-11, 9-11, 11-8 असा पराभव करत सामना बरोबरीत सोडवला.

Manika Batra
World Team Table Tennis C'Ships: भारताच्या अहिका-श्रीजाने रचला इतिहास; चीनच्या अव्वल दोन खेळाडूंना चारली पराभवाची धूळ

दरम्यान, शुक्रवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सुन यिंग्साचा पराभव करणाऱ्या अयाहिका मुखर्जीने बर्नाडेट बॅलिंटचा 7-11, 11-6, 11-7, 11-8 असा पराभव करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. चौथ्या एकेरीत मदरासने श्रीजाचा 11-4, 11-6, 5-11, 11-7 असा पराभव करुन सामना रंजक बनवला. मनिकाने पोटाविरुद्ध संयम राखत 11-5, 14-12, 13-11 असा विजय मिळवला. भारताला इतर गटात स्पेन आणि उझबेकिस्तानचा सामना करावा लागणार आहे.

Manika Batra
Table Tennis Championships मध्ये भारताने केला जर्मनीचा 3-1 ने पराभव

दुसरीकडे, पुरुष गटात पोलंडविरुद्ध फक्त हरमीत देसाई भारतीय संघासाठी विजयाची नोंद करु शकला. त्याने दुसऱ्या एकेरीत मॅकी कुबियाकचा 12-10, 13-11, 9-11, 11-5 असा पराभव केला. शरथ कमल आणि मानव ठक्कर आपापल्या एकेरी पराभूत झाले. हरमीत चौथा एकेरी खेळण्यासाठी परतला पण त्याला जेकब डायझविरुद्ध 7-11, 7-11, 11-8, 12-14 असा पराभव पत्करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com