Goa Lokotsav: फूड कोर्ट, चिनी मातीच्‍या वस्‍तूंची अनेकांवर मोहिनी; 'लोकोत्‍सवा'ला स्‍थानिकांसह पर्यटकांचीही गर्दी

Lokotsav 2026 Panaji highlights: दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी पणजीत आयोजित लोकोत्‍सवाला स्‍थानिकांसह देश-विदेशातून राज्‍यात आलेल्‍या पर्यटकांचाही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
Goa Lokotsav
Goa LokotsavDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी पणजीत आयोजित लोकोत्‍सवाला स्‍थानिकांसह देश-विदेशातून राज्‍यात आलेल्‍या पर्यटकांचाही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यातील बहुतांशी गर्दी फूड कोर्ट तसेच चिनी आणि मातीच्‍या वस्‍तूंच्‍या दुकानांवर दिसून येत आहे.

स्‍थानिकांसह दरवर्षीच्‍या पर्यटन हंगामात गोव्‍याला भेट देणाऱ्या पर्यटकांना लोकोत्‍सवाचे वेध लागलेले असतात. विविध राज्‍यांतील कलाकार लोकोत्‍सवाच्‍या व्‍यासपीठावरून आपापल्‍या राज्‍यातील पारंपरिक लोककला सादर करीत असतात.

Goa Lokotsav
Goa Municipal Election: महापालिका निवडणूक; बाबूश यांना घेरण्याची तयारी, विरोधकांची 'एकसंध' मोर्चेबांधणी; उत्पलकडे नजरा...

अनेक कारागीर आपण तयार केलेल्‍या वस्‍तू उत्‍सवात सादर करीत असतात. त्‍यामुळे अनेक राज्‍यांच्‍या लोककला आणि कारागिरी यांचा एकाच ठिकाणी अनुभव घेता येत असल्‍याने स्‍थानिकांसह पर्यटकांचे पायही या उत्‍सवाकडे वळतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकोत्‍सवात विविध राज्‍यांतील कारागिरांनी स्‍टॉल थाटले असून, आपापल्‍या राज्‍यातील प्रसिद्ध वस्‍तूंची विक्री ते स्‍टॉल्‍सच्‍या माध्‍यमातून करीत आहेत.

Goa Lokotsav
Goa Land Misuse: जमीन दिली शेतीसाठी, प्रत्‍यक्षात उभारली व्‍यावसायिक आस्‍थापने! ‘जमीन महसूल’च्‍या कलम 18 ‘क’चा 8 जणांकडून गैरवापर

लोकोत्‍सवाची पाहतो वाट!

लोकोत्‍सवात सहभागी झालेले स्‍थानिक, पर्यटक चिनी वस्‍तूंच्‍या खरेदीवर नेहमीच भर देतात. त्‍यामुळे यंदाही अशा वस्‍तूंच्‍या दुकानांवरील गर्दी वाढत आहे. गेल्‍या अनेक वर्षांपासून आपण लोकोत्‍सवात सहभागी होत आहे.

आपल्‍या वस्‍तूंची दरवर्षी मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. त्‍यामुळे आपण लोकोत्‍सवाची आतुरतेने वाट पाहत असतो, अशी प्रतिक्रिया मातीच्‍या भांड्यांची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्‍याने ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com