Most sixes hit in a single World Cup Edition: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 38वा सामना श्रीलंकाविरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. विश्वचषकाच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला गेला आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 464 षटकार मारले गेले आहेत, याआधी कोणत्याही एकदिवसीय विश्वचषकात इतके षटकार मारले गेले नव्हते.
पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक 1975 मध्ये खेळला गेला. श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिसने तंझीम हसनच्या 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 2023 विश्वचषकातील 464 वा षटकार मारुन इतिहास रचला. याआधी विश्वचषकाच्या एकाच एडिशनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम 2015 मध्ये झाला होता.
दरम्यान, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेजच्या 7 सामन्यांव्यतिरिक्त 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असे एकूण 10 सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत, चाहत्यांना आशा आहे की, यावेळी 2023 च्या विश्वचषक (World Cup) स्पर्धेत 500 षटकारांचा आकडा पार होईल.
2023 विश्वचषकमध्ये 464 षटकार
2015 विश्वचषकमध्ये 463 षटकार
2007 विश्वचषकमध्ये 373 षटकार
2019 विश्वचषकमध्ये 357 षटकार
दुसरीकडे, एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 22 षटकारांसह आघाडीवर आहे. त्याच्यानंतर या यादीत डेव्हिड वॉर्नर, क्विंटन डी कॉक, फखर जमान आणि हेन्रिच क्लासेन यांचा समावेश आहे.
रोहित शर्मा- 22
डेव्हिड वॉर्नर - 20
क्विंटन डी कॉक- 18
फखर जमान- 18
हेन्रिच क्लासेन - 17
तसेच, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा संघ दक्षिण आफ्रिका ठरला आहे. या संघाने एकूण 82 वेळा थेट चेंडू सीमापार पाठवला आहे. दक्षिण आफ्रिकेशिवाय 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आणखी चार संघ आहेत ज्यांनी 50 षटकारांचा आकडा पार केला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या नावांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिका - 82
न्यूझीलंड- 66
ऑस्ट्रेलिया- 64
भारत- 54
पाकिस्तान- 54
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.