World Cup 2023 दरम्यान केकेआरच्या 'या' स्टार खेळाडूने क्रिकेटला केला अलविदा

Sunil Narine Retirement: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.
Sunil Narine Retirement
Sunil Narine RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

Sunil Narine Retirement: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टार खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, हा खेळाडू या स्पर्धेचा भाग नव्हता. पण आता हा स्टार खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन टी20 लीग आयपीएल 2024 चा भाग असेल की नाही हा प्रश्न आहे. तो खेळाडू म्हणजे सुनील नरेन. ज्याने रविवारी (5 नोव्हेंबर रोजी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला.

बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही

दरम्यान, सुनील नरेन बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. तो जगभरातील फक्त टी-20 लीगमध्ये खेळत होता. आयपीएलमध्येही तो बराच काळ शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता.

सुनील नरेनने शेवटची कसोटी 2013 मध्ये, शेवटची वनडे 2016 मध्ये आणि शेवटची T20 2019 मध्ये त्याचा राष्ट्रीय संघ वेस्ट इंडिजसाठी खेळली होती. आता आयपीएलमध्ये (IPL) त्याचा काय निर्णय होतो हे पाहायचे आहे. मात्र, नरेन टी-20 लीग खेळत राहणार असल्याचे बोलले जात आहे.

Sunil Narine Retirement
Sunil Narine: 7 ओव्हर, 7 विकेट्स, 0 धावा...! फ्लाईट लेट झाली म्हणून क्रिकेट खेळयला गेला अन् कहर केला

फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार!

सुनील नरेनने एक पत्र जारी करुन वेस्ट इंडिजकडून (West Indies) खेळण्याचा अभिमान व्यक्त केला. माझ्या कारकिर्दीत ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्यामध्ये माझे वडील आणि कुटुंबीयांचाही समावेश आहे, असेही तो म्हणाले. त्याने देशांतर्गत 50 षटकांच्या क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. मात्र, फ्रँचायझी स्तरावर खेळणार असल्याचे नरेनने सांगितले. म्हणजेच तो आयपीएलसह जगभरातील टी-20 लीगचा भाग असेल.

Sunil Narine Retirement
Sunil Dev Died: टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय टीमच्या मॅनेजरचे निधन, BCCI मध्येही सांभाळली मोठी जबाबदारी

सुनील नरेनची कारकिर्द

सुनील नरेनच्या कारकिर्दीतील रेकॉर्डबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने वेस्ट इंडिजसाठी 6 कसोटी, 65 एकदिवसीय आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. नरेनच्या नावावर 21 कसोटी, 92 एकदिवसीय विकेट आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत.

नरेन 2012 पासून सतत आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नावावर 162 सामन्यात 163 विकेट आणि 1046 धावा आहेत. त्याने चार अर्धशतकेही झळकावली आहेत. दोनदा चॅम्पियन झालेल्या केकेआर संघाचाही तो भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com