Virat Kohli - Shreyas Iyer
Virat Kohli - Shreyas Iyer

World Cup 2023: विराटचं शतक, श्रेयसचं अर्धशतक! भारताने द. आफ्रिकेसमोर ठेवले 327 धावांचे आव्हान

India vs South Africa: कोलकातामध्ये होत असेलल्या वर्ल्डकप 2023 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवले आहे.
Published on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs South Africa:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना होत आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने शतकी खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात भारताकडून रोहित आणि शुभमन गिल यांनी सलामीला फलंदाजीला येत डावाची सुरुवात केली. एक बाजू गिलने सांभाळलेली असताना दुसऱ्या बाजूने रोहितने हल्ला चढवला होता. त्यामुळे त्यांनी 6 षटकातच भारताला 60 धावांचा टप्पा पार करून दिला होता.

Virat Kohli - Shreyas Iyer
Virat Kohli: 'रनमशीन' कोहलीला 10 वीला किती गुण मिळाले होते माहितीये का? थेट मार्कशीटच पाहा

मात्र, आक्रमक खेळणाऱ्या रोहितला 6 व्या षटकात कागिसो रबाडाने चकवले. त्याने रोहितला चूक करण्यास भाग पाडले आणि रोहित तेंबा बावुमाच्या हातात झेल देत बाद झाला. रोहितने 24 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 40 धावांची खेळी केली.

शुभमन गिलला 11 व्या षटकात केशव महाराजने अफलातून चेंडू टाकत 23 धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर मात्र, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. या दोघांनीही शानदार खेळ केला. त्यांनी अर्धशतके ठोकताना शतकी भागीदारीही केली.

मात्र, श्रेयसला 37 व्या षटकात लुंगी एन्गिडीने एडेन मार्करमच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे त्याची विराटबरोबरची 134 धावांची भागीदारी तुटली. श्रेयसने 87 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर केएल राहुलही 17 चेंडूत 8 धावा करुन लगेचच माघारी परतला.

Virat Kohli - Shreyas Iyer
Virat Kohli: शानदार जबरदस्त जिंदाबाद! विराटचं 49 व्या ODI शतकासह बर्थडे गिफ्ट, सचिनचीही बरोबरी

नंतर आलेल्या सूर्यकुमारने तुफानी फटकेबाजी केली. परंतु चांगल्या सुरुवातीनंतरही तो 5 चौकारांसह 14 चेंडूत 22 धावा करून माघारी परतला. यानंतर रविंद्र जडेजाने विराटला चांगली साथ दिली. दरम्यान, विराटने त्याचे 49 वे वनडे शतक पूर्ण करत सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली.

अखेरच्या षटकात रविंद्र जडेजाचे आक्रमण करत भारताला 326 धावांचा टप्पा गाठून दिला. विराटने 121 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीदकम्यान 10 चौकार मारले. तसेच जडेजाने 15 चेंडूत 29 धावांची नाबाद खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, मार्को यान्सिन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि ताब्राईज शम्सी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com