Women Ashes 2023: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात नोंदवला गेला खास रेकॉर्ड, 31 वर्षांनंतर...!

Women Ashes 2023: ऍशेस मालिका 2023 अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघादरम्यान आजपासून एकमेव कसोटीला सुरुवात झाली.
 Captain
CaptainDainik Gomantak
Published on
Updated on

Women Ashes 2023: ऍशेस मालिका 2023 अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघादरम्यान आजपासून एकमेव कसोटीला सुरुवात झाली. या सामन्याचा नाणेफेक होताच एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.

साधारणपणे महिला क्रिकेटमध्ये 4 दिवसांचा कसोटी सामना पाहायला मिळतो, मात्र ऍशेस सामना 5 दिवस चालण्याची ही दुसरी वेळ आहे. तसेच कुकाबुराच्या जागी पहिल्यांदाच ड्यूक बॉलचा वापर केला जात आहे.

हे इतिहासात दुसऱ्यांदा घडले

दरम्यान, महिलांच्या कसोटी इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा 5 दिवसांचा कसोटी सामना खेळला जात आहे. यापूर्वी 1992 मध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 5 दिवसांचा कसोटी सामना झाला होता. त्या सामन्यात इंग्लंड संघाचा दारुण पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाने (Australia) हा सामना एक डाव आणि 85 धावांनी जिंकला होता.

 Captain
Women Ashes 2023: इंग्लंडच्या महिला संघाची प्लेइंग 11 जाहीर, 'हे' 2 धाकड खेळाडू करणार पदार्पण

महिला ऍशेसचा रंजक इतिहास

महिलांचे कसोटी क्रिकेटही खूप जुने आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिला कसोटी सामना 1934 मध्ये खेळला गेला होता, परंतु 1998 मध्येच दोन्ही देशांदरम्यान महिला ऍशेसची अधिकृत सुरुवात झाली.

 Captain
Women Ashes: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एलिसा हीली ने केला शर्मनाक रिकॉर्ड !

दोन्ही संघाची प्लेइंग 11

इंग्लंडची प्लेइंग 11- टॅमी ब्युमॉन्ट, एम्मा लॅम्ब, हेदर नाइट (सी), नॅट सायव्हर-ब्रंट, सोफिया डंकले, डॅनियल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर, लॉरेन बेल

ऑस्ट्रेलिया प्लेइंग11 - बेथ मूनी, फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जेस जोनासेन, अॅलिसा हिली (सी आणि wk), ऍशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, अलाना किंग, किम गर्थ, डी'आर्सी ब्राउन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com