Women Ashes: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एलिसा हीली ने केला शर्मनाक रिकॉर्ड !

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची दिग्गज फलंदाज एलिसा हिलीने (Alyssa Healy) एक लाजीरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Alyssa Healy
Alyssa HealyDainik Gomantak

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Aus vs Eng) यांच्यातील अ‍ॅशेस मालिका नुकतीच संपली आहे, परंतु यावेळी ही मालिका दोन्ही देशांच्या महिला संघांमध्ये सुरु आहे. या मालिकेतील एकमेव कसोटी सामना कॅनबेरामध्ये खेळविण्यात येत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची दिग्गज फलंदाज एलिसा हिलीने एक लाजीरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हिलीने जो विक्रम आपल्या नावावर केला आहे, तो कोणत्याही फलंदाजाला आपल्या नावावर करावासा वाटणार नाही. या सामन्याच्या दोन्ही डावात हीली (Alyssa Healy) शून्यावर बाद झाली. यादरम्यान एक विचित्र योगायोग पाहायला मिळाला ज्याने हिलीचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले गेले. (Alyssa Healy Has Been Dismissed For Zero In Both Ashes Series Matches)

दरम्यान, या सामन्याच्या दोन्ही डावात एकाच जोडीने हीलीला बाद केले. पहिल्या डावात तिने कॅथरीन ब्रंटच्या (Catherine Brunt) गोलंदाजीवर यष्टिरक्षक एमी जोन्सकरवी झेलबाद केले. पहिल्या डावात तिने आठ चेंडू खेळले. याच जोडीने दुसऱ्या डावात हिलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यावेळी हिलीला केवळ दोन चेंडूंचा सामना करता आला. दोन्ही डावात विरोधी संघाच्या यष्टीरक्षकाकडून शून्यावर आऊट होणारी हीली पुरुष आणि महिला क्रिकेटमधील (Women's Cricket) पहिली यष्टिरक्षक आहे. तिच्या आधी हा विक्रम कोणत्याही यष्टिरक्षकाच्या नावे नव्हता. हिली ही ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी आहे.

Alyssa Healy
ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारी हेदर नाइट ठरली इंग्लंडची दुसरी खेळाडू

ब्रंटचाही विक्रम होता

या सामन्यात इंग्लंडची गोलंदाज कॅथरीन ब्रंटनेही विक्रम केला आहे. तिने कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 हून अधिक बळी घेणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. त्याच वेळी, कसोटीत इतक्या विकेट्स घेणारी ती 10 वी आणि एकमेव सक्रिय महिला क्रिकेटपटू आहे.

असा राहीला सामना

सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने (Australia) 2 विकेट गमावून 12 धावा केल्या होत्या. हीलीशिवाय ऑस्ट्रेलियाने आपली दुसरी सलामीवीर रेचेल हेन्सची विकेटही गमावली. बेथ मुनी सात धावा करुन खेळत असून एलिसा पेरीने खातेही उघडले नाही. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव नऊ गडी गमावून 337 धावांवर घोषित केला. इंग्लंडला पहिल्या डावात केवळ 297 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 40 धावांची आघाडी घेतली. आता त्यांची आघाडी 52 धावांनी पुढे घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com