Wimbledon 2023 Rohan Bopanna-Gabriela Dabrowski and Yuki Bhambri-Saketh Myneni crash out of Tournament: लंडनमध्ये सध्या विम्बल्डन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू आहे. पण या स्पर्धेत भारताच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.
युकी भांबरी आणि साकेत मायनेनी या भारतीय जोडीला रविवारी विम्बल्डनच्या पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत स्पेनचा अलेक्झांडर डेव्हिडोविच फोकिना आणि फ्रान्सच्या एड्रियन मॅनारिनो या जोडीकडून पराभवाचा धक्का बसला. तसेच रोहन बोपन्ना आणि गॅब्रिएला डॅब्रोवस्की यांची जोडीही मिश्र दुहेरीत पराभूत झाली आहे.
युकी आणि साकेतच्या जोडीला अलेक्झांडर डेव्हिडोविच फोकिना आणि एड्रियन मॅनारिनो यांनी तीन सेटमध्ये पराभूत केले. जवळपास दोन तास चाललेल्या या सामन्यात युकी आणि साकेतला 4-6, 6-4, 4-6 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.
तसेच मिश्र दुहेरीत भारताचा बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रिएला यांच्या जोडीला 2019 विम्बल्डन विजेती जोडी इवान डोडीग आणि लतिशा चॅन यांनी दुसऱ्या फेरीत 7-6 (5), 3-6, 4-6 असे पराभूत केले.
बोपन्ना आणि गॅब्रिएला यांनी 2017 मध्ये फ्रेंच ओपन जिंकले होत. या जोडीने विम्बल्डन 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पहिल्या डावात 53 मिनिटे झुंज दिल्यानंतर टाय ब्रेकर जिंकत आघाडी मिळवली होती. पण नंतर ही आघाडी टिकवता आली नाही आणि नंतरच्या दोन्ही सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्याने सामनाही गमवावा लागला.
दरम्यान 43 वर्षीय बोपन्ना मिश्र दुहेरीत पराभूत झाला असला, तरी त्याचे पुरुष दुहेरीत आव्हान कायम आहे. तो पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनविरुद्ध खेळत आहे. त्यांची जोडी उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचली आहे.
विम्बल्डन ज्यूनियर स्पर्धेत भारताचा 16 वर्षीय मानस धामनेने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.