Wimbledon: नोव्हाक जोकोविचचा मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा खेळाडू

Novak Djokovic Record: नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनमध्ये मोठा विक्रम केला. 350 वा ग्रँडस्लॅम सामना जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.
Novak Djokovic
Novak DjokovicDainik Gomantak
Published on
Updated on

Novak Djokovic Record: नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनमध्ये मोठा विक्रम केला आहे. 350 वा ग्रँडस्लॅम सामना जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. जोकोविचच्या आधी रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांनी ही कामगिरी केली आहे.

विम्बल्डनमध्ये पुरुष गटात सर्वाधिक 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकणाऱ्या जोकोविचने जॉर्डन थॉम्पसनचा 6-3, 7-6, 7-5 असा पराभव केला.

नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) आणि इगा स्वितेक यांनी पुढील फेरीत जाण्यासाठी आपले सामने जिंकले आहेत. दोन वर्षांपूर्वीची उपविजेती कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पात्रता फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

'जस्ट स्टॉप ऑइल' आंदोलकांनी गोंधळ घातला

त्याचवेळी, क्रिकेटच्या ऍशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर 'जस्ट स्टॉप ऑइल'च्या आंदोलकांनी टेनिस स्पर्धेत गोंधळ घातला. आंदोलकांनी नारंगी कागदाचे तुकडे टेनिस कोर्टवर फेकून सामना उधळून लावला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आंदोलकांनी सेंट्रल कोर्टवरील बॉक्समध्ये नारंगी कागद लपवून ठेवले होते. यासोबतच पावसानेही सामन्यात व्यत्यय आणला. यामुळेही सामन्यातील बराच वेळ वाया गेला.

Novak Djokovic
Novak Djokovic wins French Open 2023: नोव्हाक जोकोविचने रचला इतिहास, फायनलमध्ये कॅस्पर रुडचा पराभव करुन जिंकले 23 वे ग्रँडस्लॅम

जस्ट स्टॉप ऑइल आंदोलन?

सध्या इंग्लंडमध्ये (England) 'ऑइल प्रोटेस्ट' सुरु आहे. सरकारच्या नवीन तेल, वायू आणि कोळसा धोरणाविरोधात ब्रिटनमध्ये जस्ट स्टॉप ऑइल नावाच्या गटाकडून निदर्शने सुरु आहेत. या निषेधार्तंगत, ऍशेस आणि डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी खेळपट्टी खराब होण्याची शक्यता समोर आली आहे.

'जस्ट स्टॉप ऑइल' या पर्यावरणीय गटाच्या युतीने गेल्या 18 महिन्यांत यूकेमध्ये प्रीमियर लीग फुटबॉल सामने, रग्बी युनियनची प्रीमियरशिप फायनल आणि जागतिक स्नूकर चॅम्पियनशिपसह अनेक हाय-प्रोफाइल क्रीडा स्पर्धांमध्ये व्यत्यय आणला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com