DEXA टेस्ट आहे तरी कशी अन् टीम इंडियातील निवडसाठी का ठरणार महत्त्वाची?

बीसीसीआयच्या निर्णयानुसार भारतीय संघातील निवडीसाठी डेक्सा टेस्टचाही सामना खेळाडूंना करावा लागणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

DEXA Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) रविवारी रिव्ह्यू मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये अनेक बाबींवर चर्चा झाली असून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात संघनिवडीसाठीच्या निकषाबाबतही निर्णय झाले आहेत.

दरम्यान, या मिटिंगमध्ये झालेल्या निर्णयानुसार आता बीसीसीआयने पुन्हा एकदा यो-यो टेस्टला संघ निवडीचा भाग बनवले आहे. तसेच त्याच्या जोडीला बीसीसीआयने डेक्सा टेस्टही संघनिवडीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले आहे. या टेस्ट केंद्रीय करारबद्ध असलेल्या खेळाडूंसाठीही लागू असतील.

गेल्या काही महिन्यांत अनेक खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. यो-यो टेस्ट यापूर्वीही भारतीय संघात निवडीसाठी अनिवार्य होती. या टेस्टमुळे यापूर्वी अनेक खेळाडूंना भारतीय संघातील जागाही गमवावी लागली आहे.

(What is DEXA Test?)

Team India
'Team India'साठी नववर्ष व्यस्त! वर्ल्डकप, आशिया चषक अन् द्विपक्षीय मालिकांची पर्वणी, पाहा टाईमटेबल

डेक्सा टेस्ट म्हणजे काय?

आता बीसीसीआयने यो-यो टेस्टच्याबरोबर डेक्सा टेस्टही संघ निवडीचा भाग बनवली असल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की ही टेस्ट नक्की असते काय?

तर डेक्सा म्हणजे ड्युएल-एनर्जी एक्स-रे ऍब्सॉर्पशोमेट्री (Dual-energy X-ray absorptiometry). डेक्सा टेस्टचा वापर खेळाडूंच्या शरीरातील फॅटची टक्केवारी, स्नायूंचे वजन, पाण्याचे प्रमाण आणि हाडांचे वजन (bone density) तपासण्यासाठी होतो.

डेक्सा ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. स्पेक्ट्रल इमेजिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या विशेष तंत्राचा वापर करून ही चाचणी केली जाते. या टेस्टमध्ये वेगवेगळ्या ऊर्जा स्तरांवरील दोन एक्स-रे बीम खेळाडूच्या हाडांकडे निर्देशित केले जातात. त्यातून खेळाडूंच्या हाडांची, फॅट्सची तपासणी होती. साधारण 10 मिनिटाची ही टेस्ट असते.

Team India
BCCI Meeting: यो-यो टेस्ट ते संघनिवडीचे निकष, बीसीसीआयचे रिव्ह्यू मिटिंगमध्ये मोठे निर्णय

डेक्सा टेस्ट महत्त्वाची आहे का?

गेल्या काही दिवसात एका दुखापतीनंतर खेळाडूंनी पुनरागमन केल्यानंतर त्यांना पुन्हा दुखापतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अधिक काळ खेळाडूंना मैदानातून बाहेर राहावे लागत आहे. जसप्रीत बुमराह, दीपक चाहर अशा खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे.

ज्यावेळी खेळाडू दुखापतग्रस्त होतो, त्यावेळी त्याच्या हाडांच्या ताकदीवरही परिणाम होतो. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी किंवा त्याचे मुल्यमापन होण्यासाठी डेक्सा टेस्ट महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यामुळे खेळाडूंना त्याच्या तंदुरुस्तीकडे आणखी गांभीर्याने लक्ष देता येऊ शकते. तसेच त्यामुळे त्यांना सातत्याने दुखापत होण्यापासून वाचता येऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com