BCCI Meeting: यो-यो टेस्ट ते संघनिवडीचे निकष, बीसीसीआयचे रिव्ह्यू मिटिंगमध्ये मोठे निर्णय

बीसीसीआयच्या रिव्ह्यू मिटिंगमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

नवीन वर्षाची सुरुवात होताच भारतीय क्रिकेटमध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे. रविवारी बीसीसीआयची रिव्ह्यू मिटिंग मुंबईत पार पडली आहे. या मिटिंगमधअये काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली आहे.

Team India
Team India: ऋषभ पंत अन् जस्सीचा कसोटी क्रिकेटमध्ये जलवा, BCCI ने केली मोठी घोषणा!

या मिटिंगमध्ये बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि भारतीय वरिष्ठ संघाचे निवड समीती अध्यक्ष चेतन शर्मा यांचा समावेश होता.

आगामी काळात या वर्षात भारताला वनडे वर्ल्डकपही मायदेशात खेळायचा आहे. तसेच २०२२ मध्ये टी20 वर्ल्डकपमधील भारताची कामगिरी, खेळाडूंची तंदुरुस्ती अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली आहे. तसेच वनडे वर्ल्डकपसाठी संभाव्य 20 खेळाडूंबद्दलही चर्चा या मिटिंगमध्ये झाली.

Team India
IND vs PAK: भारत-पाकिस्तान कसोटी सामन्याबाबत BCCI स्पष्टच..., PCB चे उडाले होश

बीसीसीआयच्या रिव्ह्यू मिटिंगमधील महत्त्वाचे मुद्दे

  • खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत आहेत. या गोष्टीचा विचार करता बीसीसीआयने पुन्हा एकदा यो-यो टेस्ट आणि डेक्सा चाचणीला संघ निवडीचा भाग बनवले आहे. या चाचण्या केंद्रीय करारबद्ध असलेल्या खेळाडूंसाठीही लागू असतील.

  • आगामी वनडे वर्ल्डकप आणि अन्य मालिका आणि स्पर्धांचा विचार करता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी निवडक भारतीय खेळाडूंच्या आयपीएल 2023 मधील सहभागावर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या आयपीएल फ्रँचायझींच्या साथीने काम करेल.

  • याबरोबरच एनसीए खेळाडूंच्या कामाच्या ताणाचीही देखरेख करेल. कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंच्या दुखापतीचे प्रमाण वाढले आहे.

  • बीसीसीआयने असाही निर्णय घेतला आहे की भारतीय संघात निवड होण्यासाठी उदयोन्मुख खेळाडूने पुरेसे देशांतर्गत क्रिकेट खेळणे गरजेचे असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com