Virat Kohli Record: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) खेळवला जाणार आहे. हा सामना बार्बाडोस येथील ब्रिजटाउनमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली खास विक्रम केला आहे.
या सामन्यात जर विराट कोहलीने 102 धावा केल्या, तर तो त्याच्या वनडे कारकिर्दीत १३ हजार धावांचा टप्पा पार करेल. तो 13 हजार धावा करणारा तो पाचवा खेळाडू ठरेल. याशिवाय सर्वात जलद 13 हजार वनडे धावा करणारा खेळाडूही ठरेल.
सध्या विराटच्या नावावर 275 वनडे सामन्यातील 265 डावात 12898 धावांची नोंद आहे. यामध्ये त्याच्या 46 शतकांचा आणि 65 अर्धशतकांचा समावेश आहे.
वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 13 हजार धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर (18426), कुमार संगकारा (14234), रिकी पाँटिंग (13704) आणि सनथ जयसूर्या (13430) यांनी पार केला आहे.
तसेच वनडेत सर्वात जलद 13 हजार वनडे धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सध्या अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 321 डावात 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग असून त्याने 341 डावात 13 हजार धावा केल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर कुमार संगकारा आहे आणि चौथ्या क्रमांकावर सनथ जयसूर्या आहे. संगकाराने 363 डावात आणि जयसूर्याने 416 डावात 13 हजार धावांचा टप्पा पार केला होता.
दरम्यान, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा सामना जिंकला, तर भारत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही खिशात घालेल. या वनडे मालिकेतील पहिला सामना भारताने 5 विकेट्सने सहज जिंकला होता. त्यामुळे भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे.
त्याचमुळे भारतीय संघ दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल, पण त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघही दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. जर वेस्ट इंडिज संघ दुसरा वनडे सामना जिंकला, तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी होईल आणि तिसरा वनडे सामना निर्णायक ठरेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.