RCB ला मिळाला नवा कोच! 'या क्रिकेटरच्या खांद्यावर जबाबदारी, तर दोन दिग्गजांची सुटली साथ

RCB New Coach: टी20 वर्ल्डकप विजेता कोच आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएलमध्ये मार्गदर्शन करणार आहे.
RCB
RCBDainik Gomantak
Published on
Updated on

RCB New Coach: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीने 17 व्या हंगामापूर्वी मोठे बदल केले आहेत. आरसीबी फ्रँचायझीने संघासाठी नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. पण याबरोबरच संघाचा दोन प्रमुख सदस्यांबरोबरील मार्ग वेगळा झाला आहे.

माईक हेसन आणि संजल बांगर यांचा आरसीबी संघाबरोबरील करार संपला असल्याने त्यांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. माईक हेसन आणि संजय बांगर जवळपास गेल्या ४ वर्षांपासून एकत्र काम करत होते.

माईक हेसन यांनी आरसीबीबरोबर प्रशिक्षक म्हणून तसेच नंतर क्रिकेट संचालक म्हणून काम पाहिले. तसेच बांगलरही कोचिंग स्टाफमध्ये होते. ते 2023 आयपीएल हंगामावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आरसीबीने 2021 आणि 2022 आयपील हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पण 2023 मध्ये संघाला प्लेऑफ गाठता आली नाही.

RCB
Yuzvendra Chahal: 'RCB ने बाहेर केल्यावर खूप राग आला, पहिल्या मॅचमध्ये तर...' चहलचं मनातलं दु:ख आलं ओठांवर

नवीन प्रशिक्षक

दरम्यान आता हेसन आणि बांगर यांच्या जाण्यानंतर आरसीबीने संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी झिम्बाब्वेचे दिग्गज क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांची नियुक्ती केली आहे. याबद्दल आरसीबीने ट्वीट करत माहिती दिली आहे.

आरसीबीने दिले अपडेट

आरसीबीने हेसन आणि बांगर यांच्याबद्दल ट्वीट केले की 'आम्ही माईक हेसन आणि संजय बांगर यांचे आरसीबीबरोबर क्रिकेट संचालक आणि प्रमुख प्रशिक्षक म्हणून त्यांच्या कार्यकाळाबद्दल आभार मानतो.'

'त्यांनी नेहमीच उच्च दर्जाची व्यावसायिकता आणि नैतिकता दाखवली. त्यांनी गेल्या चार वर्षात अनेक युवा खेळाडूंना शिकण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी व्यासपीठ दिले.'

पुढे आरसीबीने त्यांना शुभेच्छा देताना लिहिले, 'त्यांचा कार्यकाळ संपत असताना आम्ही माईक आणि संजय यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.'

RCB
Video: 6,6,6,6,6 अन् युवीचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला! इंग्लंडमध्ये RCB च्या फलंदाजाचं तुफान

त्याचबरोबर अँडी फ्लॉवर यांचे स्वागत करताना आरसीबीने ट्वीट केले, 'आम्हाला आयसीसी हॉल ऑफ फेमचे सदस्य आणि टी20 वर्ल्डकप विजेते प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचे आरसीबीच्या पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वागत करताना आनंद होत आहे.'

'अँडी यांचा आयपीएल आणि टी20 संघांबरोबरील अनुभव मोठा आहे. आणि त्याने त्याच्या मार्गदर्शनाखाली संघांना पाकिस्तान सुपर लीग, आयएलटी20 स्पर्धा, द हंड्रेड आणि अबुधाबी टी10 या स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले आहे. तो संघाची विजेतेपद मिळवण्यासाठीही मानसिकता तयार करण्यासाठी आणि आरसीबीचे तत्वज्ञान पुढे नेण्यात मदत करेल.'

अँडी फ्लॉवर यांचा मोठा अनुभव

अँडी फ्लॉवर यांना प्रशिक्षण क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने 2010 साली टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

तसेच त्यांना आयपीएलचाही चांगला अनुभव होता. ते गेले दोन आयपीएल हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक होते. पण नुकताच त्यांचा लखनऊबरोबरचा करार संपला. त्यामुळे आता ते पुढीलवर्षी आरसीबीचे मार्गदर्शन करताना दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com