WI vs IND, 1st T20I: जेसन होल्डरनं भारतीय संघाला लावला 'होल्ड', एकाच षटकात पालटली बाजी

India vs West Indies: वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारतासाठी एक षटक कलाटणी देणारे ठरले.
Jason Holder
Jason HolderDainik Gomantak
Published on
Updated on

West Indies vs India, 1st T20I, Turning Point: गुरुवारी वेस्ट इंडिज संघाने भारतीय संघाला टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अवघ्या 4 धावांनी पराभूत केले. त्यामुळे 5 सामन्यांच्या या टी20 मालिकेत यजमान वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यातील जेसन होल्डरने गोलंदाजी केलेले एक षटक कलाटणी देणारे ठरले.

या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खास झाली नव्हती. भारताने सलामीवीर शुभमन गिल (3) आणि इशान किशन (6) यांच्या विकेट्स पहिल्या 5 षटकांच्या आतच गमावल्या होत्या.

पण नंतर सूर्यकुमार यादव (21) आणि तिलक वर्मा (39) यांनी डाव सावरला. मात्र, या दोघांनी खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर विकेट्स गमावल्या. पण तरी त्यांनी भारताच्या डावाला स्थैर्य मिळवून दिले होते. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता.

Jason Holder
WI vs IND 1st T20: वन डेत बाकावर बसवून ठेवले, T-20 मध्ये संधी मिळताच 'या' फिरकीपटूने केला मोठा धमाका

हार्दिक आणि सॅमसननी भारताला 110 धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. त्यामुळे या दोघांची भागीदारी भारतासाठी महत्त्वाची ठरणार होती. अशातच 16 व्या षटकात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेलने जेसन होल्डरकडे चेंडू सोपवला. त्यानेही या संधीचा फायदा घेत षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला त्रिफळाचीत केले.

होल्डरने टाकलेला ऑफ कटर चेंडू खेळताना हार्दिक चूकला. त्यामुळे तो 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर नवा फलंदाज अक्षर पटेलने एकही धाव काढली नाही.

तिसऱ्या चेंडूवर त्याने कव्हरला फटका मारला. यावेळी अक्षर आणि सॅमसन यांनी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण काईल मेयर्सने चपळाईने चंडू पकडत यष्टीरक्षकाच्या एन्डला थेट स्टंपवर तो मारला. त्यावेळी चेंडू स्टंपवर आदळेपर्यंत सॅमसन क्रिजमध्ये परतला नव्हता. त्यामुळे तो 12 धावांवर बाद झाला.

Jason Holder
WI vs IND 1st T20: होल्डरच्या भेदक माऱ्याने टीम इंडियाची दाणादाण! विंडिजचा 4 धावांनी निसटता विजय

त्यामुळे एकाच षटकात भारताला हे दोन मोठे धक्के बसले. ज्याचा मोठा परिणाम झाला. कारण त्यानंतर भारताच्या तळातील फळीला फलंदाजीला उतरावे लागले. पण त्यांनाही खास काही करता आले नाही आणि भारतीय संघाला 20 षटकात 9 बाद 145 धावाच करता आल्या.

तत्पुर्वी, या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 149 धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार पॉवेलने 32 चेंडूत 48 धावांची खेळी केली. तसेच निकोलस पूरनने 34 चेंडूत 41 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलमने छोटेखानी पण महत्त्वपूर्ण 28 धावांची खेळी केली.

भारताकडून अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com