World Cup 2023 Final: ''आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत...'', टीम इंडियाच्या पराभवानंतर PM मोदींचे ट्वीट

World Cup 2023 Final: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023 Final: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा चॅम्पियन बनला, तर भारताचे तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. तसेच, भारताने आयोजित केलेला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मोठ्या निराशेने संपला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर टीम इंडियाचे सांत्वन केले. त्यांनी लिहिले की, ''प्रिय टीम इंडिया (Team India), विश्वचषकादरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय वाखणण्याजोगा होता. तुम्ही शानदार कामगिरी केली. देशाला तुमच्यावर अभिमान आहे. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत.''

त्याचवेळी, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, 'टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आम्ही तुमच्यावर सदैव प्रेम करतो. तसेच, विश्वचषकातील विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.'

PM Modi
World Cup 2023 Final: ऑस्ट्रेलियन गोलंदाजी चमकली! विश्वविजयासाठी भारताचे कांगारुंना 241 धावांचे लक्ष्य

दुसरीकडे, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 241 धावांचे लक्ष्य दिले होते, जे पॅट कमिन्सच्या संघाने 43 षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सहाव्यांदा चॅम्पियन बनला आहे.

PM Modi
World Cup 2023 Final: रोहित-गिल जोडी 'हिट', गांगुली-तेंडुलकर यांच्या खास क्लबमध्ये सामील!

तसेच, आयसीसीने (ICC) यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 10 मिलियन अमेरिकन डॉलरची (भारतीय चलनानुसार साधारण 84 कोटी रुपये) बक्षीस म्हणून तरतूद केली होती.

या 10 मिलियन अमेरिकन डॉलरपैकी 4 मिलियन (साधारण 33 कोटी रुपये) विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला मिळाले आहेत. तसेच, उपविजेत्या भारतीय संघाला 2 मिलियन अमेरिकन डॉलर (16.5 कोटी रुपये) मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com